Love jihad : ‘लव्ह जिहाद म्हणजे दहशतवादाचे नवे रुप’; गिरिराजसिंह

लव्ह जिहादच्या रूपात दहशतवादाच्या माध्यमातून भारतातील सनातन धर्म नष्ट करण्याचे सुनियोजित कारस्थान
Giriraj Singh statement Love Jihad is new form of terrorism politics
Giriraj Singh statement Love Jihad is new form of terrorism politicsesakal
Updated on

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री गिरिराजसिंह यांनी ‘लव्ह जिहाद’ला दहशतवादाचे नवे रूप म्हटले आहे. लव्ह जिहादच्या रूपात दहशतवादाच्या माध्यमातून भारतातील सनातन धर्म नष्ट करण्याचे सुनियोजित कारस्थान रचले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा व अनेक भाजप नेते लव्ह जिहाद व प्रस्तावित लोकसंख्या नियंत्रण कायदा याबाबत उघडपणे बोलत आहेत. संसदेने लोकसंख्या नियंत्रण कायदा लवकरात लवकर करण्याची गरज असून तसे झाल्यास देशाचा सर्वांगीण विकास होईल, असेही प्रतिपादन गिरिराजसिंह यांनी केले.

लव्ह जिहादच्या रूपाने दहशतवादाच्या माध्यमातून भारतातील सनातन धर्म नष्ट करण्याचे भयंकर षडयंत्र रचले जात आहे. ते सनातन धर्म मानणाऱ्यांनी संघटित होऊन हाणून पाडावे, असेही ते म्हणाले. दिवंगत आमदार कृष्णानंद राय यांच्या पुण्यतिथीनिमित्त उत्तर प्रदेशातील मोहम्मदाबाद येथे आयोजित श्रद्धांजली सभेला बोलताना ते म्हणाले, की चीनमध्ये दर मिनिटाला १० मुले जन्माला येतात, तिथे भारतात दर मिनिटाला ३१ मुले जन्माला येत आहेत. त्यामुळे विकास वेगाने होत नाही.विकासाला खीळ बसते. योगी आदित्यनाथ सरकारचे कौतुक करताना ते म्हणाले की, राज्यात गुंडाराजचा वेगाने खातमा केला जात असून गुन्हेगारांचे उर्वरित आयुष्यही आता तुरुंगातच व्यतीत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.