नवी दिल्ली- देशातील महिला कुठे सुरक्षित आहेत असा प्रश्न निर्माण होत आहे. महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यातच दिल्लीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीच्या चाणक्य पुरीमधील बुद्ध जयंती पार्कमध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे.
संतापजनक म्हणजे तरुणीच्या मित्रानेच त्याच्या एका मित्राच्या साहाय्याने हे कृत्य केलं आहे. दिवसाढवळ्या पार्कमध्ये हा बलात्कार झाला असल्याने खळबळ उडाली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून चाणक्य पुरी पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी दोन्ही आरोपींना पकडलं आहे.