नवी दिल्ली - भारतात लोकशाहीची हत्या सुरु आहे. काँग्रेसनं मागील सत्तर वर्षांत जे कमावलं ते भाजपानं आठ वर्षात संपवलं आहे, असा घणाघात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केला आहे. सध्या केंद्र सरकारवर टीका करण्याचं स्वातंत्र्य राहिलेलं नाही म्हणत राहुल यांनी मोदींवर हल्लाबोल केला. यावेळी राहुल गांधी यांनी जर्मनीचा हुकूमशहा हिटलरचे उदाहरण देत टीका केली. (Rahul Gandhi news in Marathi)
राहुल गांधी म्हणाले की, हिटलर देखील निवडणूक जिंकायचा. मात्र तो निवडणूक कसा जिंकायचा ते मी सांगतो. जर्मनीतील सर्व संस्था हिटलरच्या हातात होत्या. पॅरामिलिटरली फोर्ससह संपूर्ण ढाचा हिटलरकडे होता. तसा मला संपूर्ण ढाचा द्या. मग मी दाखवतो, निवडणूक कशी जिंकता येते, असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली.
गांधी यांनी केंद्रावर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, संयुक्त राष्ट्रांना खोटं ठरवण्यापर्यंत केंद्र सरकारची मजल गेली आहे. देशात दिवसेंदिवस महागाईचे आकडे वाढत आहेत. वाढते महागाईचे आकडे अर्थमंत्र्यांना दिसत नाहीत का?, असा सवालही त्यांनी यावेळी केली आहे. कोरोना काळातील मृत्यूची आकडेवारी केंद्राकडून लपवली का जाते? स्टार्टअप इंडिया कुठे आहे? असेही काही सवाल त्यांनी मोदी सरकारला केले आहेत.
राहुल पुढं म्हणाले की, मी सत्य बाहेर आणतो म्हणून माझ्यावर कारवाई करतात, मात्र मी बोलत राहणार असंही राहूल गांधींनी खडसावून सांगितल. माझी भूमिका आक्रमक आहे. या भूमिकेद्वारे मी देशातील जनतेच्या प्रश्नांना तोंड फोडण्याच काम करणार आहे. सध्या भारतीय नागरिक महागाई, बेरोजगारीविरुद्ध लढा देत आहे. या विरोधात बोलल्यानंतर माझ्यावर पलटवार होणार आहेत, मात्र तरीही मी बोलत राहणार असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.