लखनऊ : सध्या देशात कोरोना व्हायरसचा कहर दिसून येतोय. गेल्या एक वर्षापासून भारतात या व्हायरस धुमाकूळ घातला आहे. कोरोनावर अद्याप तरी कसल्याही प्रकारचे औषध उपलब्ध झालं नाहीये. मात्र, या व्हायरसविरोधात लढण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या अनेक लशी सध्या जगभरात उपलब्ध झाल्या आहेत. भारतासहित अनेक देशांमध्ये सध्या लशीकरणाची प्रक्रिया सुरु आहे. 45 वर्षे वयावरील लोकांचं सध्या कोरोना लशीकरण केलं जात आहे. मात्र, उत्तर प्रदेशातील शामलीमध्ये लशीकरणाबाबत एक विचित्र घटना घडली आहे. बेजबाबदारपणा काय असू शकतो, याचं नमूनेदार उदाहरण म्हणून या घटनेकडे पाहता येईल. तीन वयस्कर महिलांना कोरोनाच्या लशीऐवजी एँटी रेबिजचे इंजेक्शन दिलं गेलं आहे. यामुळे तीन व्यक्तींपैकी एका व्यक्तीची तब्येत देखील खराब झाली आहे.
शामलीमधील तीन वयस्कर महिला कोरोनाची लस घेण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, तिथल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे त्या तीन वयस्कर महिलांना एँटी रेबीजचे इंजेक्शन दिलं गेलं आहे. त्यामुळे, त्यातल्या एका महिलेची तब्येत देखील बिघडली आहे. पीडितेने तिथल्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार करुन चुकीची लस देणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली आहे.
असा झाला खुलासा
सरोज, अनारकली आणि सत्यवती अशा तीन महिला कोरोनाविरोधातील लस घेण्यासाठी आल्या होत्या. आरोग्य कर्मचाऱ्यांनी बाहेरील मेडिकल स्टोअरमधून 10-10 रुपयांची सीरिंज मागवली. तिघींनाही लस दिली आणि घरी जाण्यास सांगितलं. काही वेळानंतर सरोज यांना चक्कर यायला लागली तसेच अस्वस्थ वाटायला लागलं. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना एका खासगी दवाखान्यात नेलं. तिथं त्यांनी डॉक्टरांना ओपीडीमधील चिठ्ठी दाखवली. ती चिठ्ठी पाहून डॉक्टरदेखील हैराण झाले. आणि त्यांनी सांगितलं की, यांना एँटी रेबीज लस दिली गेली आहे. त्यानंतर इतर दोन महिलांना याबाबत कळल्यावर त्यांनी देखील आपली चिठ्ठी दाखवली. तर त्यांनाही एँटी रेबीज इंजेक्शनच दिलं गेलं होतं. अधिक्षक डॉ. विजेंद्र यांनी सांगितलं की, त्यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. आणि असा प्रकार घडणे हा मोठा बेजबाबदारपणा आहे. याबाबत अधिकाऱ्यांना कळवलं गेलं आहे. संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांविरोधात यासंदर्भात कारवाई केली जाईल. तर, या संपूर्ण प्रकरणाची तपासणी केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.