काँग्रेसला आणखी एक झटका; राखी प्रभुदेसाईंचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

Rakhi Prabhudesai Naik
Rakhi Prabhudesai Naikesakal
Updated on
Summary

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत.

Goa Assembly Election 2022 : गोव्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. आता प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रवक्त्या राखी प्रभुदेसाई नाईक (Rakhi Prabhudesai Naik) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. नाईक यांनी बुधवारी काँग्रेस पक्षाला (Congress party) रामराम करत तृणमूल काँग्रेसमध्ये (Trinamool Congress) प्रवेश केलाय.

राखी प्रभुदेसाई यांनी गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांच्याकडं राजीनामा सुपूर्द केला. यानंतर, प्रभुदेसाईंनी ट्विट करत काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका केलीय. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, की मी जड अंतःकरणानं आणि विचारविनिमयानं काँग्रेस पक्ष सोडत आहे, असं नमूद करत राखी यांनी काँग्रेसच्या दिशाहीन नेतृत्वावर देखील ताशेरे ओढलेत. माझ्या राजीनाम्याला काँग्रेसचं नेतृत्वचं जबाबदार असल्याचं त्यांनी म्हंटलंय.

Rakhi Prabhudesai Naik
मुकेश अंबानींनी 800 रुपयांत काम करणाऱ्या नीताशी का केलं लग्न?

राखी पुढे म्हणाल्या, गोव्यातील काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते केंद्रीय नेतृत्वाच्या विरोधात काम करत आहेत. इथं स्थानिक नेतृत्व पूर्णपणे गोंधळलं असून गोव्यात भाजपला तृणमूल काँग्रेस हा एकमेव पर्याय आहे. राखीनं दोन महिन्यांपूर्वी शिवसेना (Shiv Sena) सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Rakhi Prabhudesai Naik
सिनेमागृहात धुमाकूळ घालणाऱ्या 'पुष्पा'वर उदयनराजे फिदा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.