Goa Election : भाजपला पर्रिकरांची उणीव भासणार

कोरोनाची तिसरी लाट उसळी घेत असतानाच गोव्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे.
Manohar Parrikar
Manohar ParrikarSakal
Updated on

कोरोनाची तिसरी (Corona) लाट उसळी घेत असतानाच गोव्यात विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) घोषणा करण्यात आली आहे. राज्यात ११,५६,४६४ मतदार ४० विधानसभा मतदारसंघातून मतदान (Voting) करत नवी विधानसभा निवडणार आहेत. सध्याच्या विधानसभेची मुदत १५ मार्च रोजी संपुष्टात येत असल्याने त्यादृष्टीने विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीही सुरू केली होती.

सत्ताधारी भाजपाने (BJP) गेल्या महिन्याभरात अन्य पक्षांतील बलाढ्य उमेदवारांची आयात करून आपली तटबंदी मजबूत करण्यावर अधिक भर दिला. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने (Congress) मात्र संधी असूनही आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनक्षोभ असूनही या कालावधीत ना संघटनात्मक बांधणी केली, ना सुयोग्य उमेदवारांना जनतेसमोर आणले. या स्थितीचा लाभ गेली पाच वर्षे लोकांत मिसळून काम करणारा आम आदमी पक्षाला मिळेल असे वाटत असतानाच ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने गोव्यात प्रवेश केला आणि काँग्रेसच्या दोन व राष्ट्रवादीच्या एका आमदाराला गळाला लावण्यात यश मिळवले आहे. (Goa Assembly Election Updates)

Manohar Parrikar
राज्य सरकारची नवी नियमावली; नाईट कर्फ्यूची घोषणा

या पक्षांबरोबरच स्थानिक महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड या पक्षांच्या जोडीला पहिल्यांदाच निवडणुकीच्या राजकारणात आलेला रिव्हॉल्युशनरी गोवन्स हा पक्ष लढतीत असेल. कॉंग्रेसने गोवा फॉरवर्डशी तर मगो पक्षाने तृणमूल कॉंग्रेसशी आघाडी केली असून या दोन्ही आघाडीतल्या घटकांत महाआघाडी साकारण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्याचे वृत्त आहे. भाजपच्या विरोधात एकास एक उमेदवार उभे केले तर निवडणुकीचे अनपेक्षित निकाल लागू शकतात.

कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे निवडणूक प्रचारावर निर्बंध येणे अटळ आहे. मात्र राज्याच्या हिताशी निगडित असलेल्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर या निमित्ताने सार्वजनिक चर्चा होणे अपेक्षित आहे. वाढती बेरोजगारी, भूमाफियाचा सत्ताकेंद्रातला सुळसुळाट, खाण उद्योगाला पुनःस्थापित करण्यात सरकारला आलेले अपयश, पर्यटन क्षेत्रातली वाढती गुन्हेगारी, शिक्षणक्षेत्रातली बजबजपुरी हे यावेळच्या निवडणुकीच्या प्रचाराचे ठळक मुद्दे असतील.

Manohar Parrikar
लंबूजी ईशांतच्या प्रेमाचा किस्सा; बास्केट बॉलच्या मैदानातून फुलली प्रेम कहाणी

मतदारांत महिलांचे प्रमाण ५१.३ टक्के (५,९३,९६०) इतके आहे. महिलाशक्तीची जाणीव बहुतेक पक्षांना झालेली असून निवडणूकपूर्व आश्वासनांतून महिलांच्या तुष्टीकरणाचा प्रयत्न होताना दिसतो. प्रत्येक महिलेस पाच हजार रोख रक्कम दरमहा देण्याची घोषणा तृणमूल काँग्रेसने केली असून इतर पक्षही अशीच घोषणा या आठवडाभरात करतील. मात्र महिलांना विधानसभेत सुयोग्य प्रतिनिधित्व देण्यासाठी कोणताच पक्ष उत्सुक असलेला दिसत नाही.

मावळत्या विधानसभेतही केवळ दोनच महिला आमदार होत्या. गेली दोन दशके राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या निधनानंतर भारतीय जनता पक्ष पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीस सामोरा जात आहे. पक्षाला त्यांची उणीव निश्चितपणे भासेल.

- राजू नायक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.