गोवा निवडणुकीसंदर्भात आठवलेंचं मोठं विधान; म्हणाले, 'सर्व 40 जागांवर आम्ही...'

Ramdas-Athawale
Ramdas-Athawale
Updated on

पनवेल: देशातील पाच राज्यांमधील निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या राज्यांमधील राजकारण तापलं आहे. गोवा विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election 2022) लढवणार का, या प्रश्नाचं उत्तर रिपाईचे प्रमुख रामदास आठवले यांनी दिलं आहे. तसेच त्यांनी शिवसेनेवर देखील टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की, गोव्यात शिवसेनेचं अस्तीत्व नगण्य आहे. शिवसेनेने अनेक वेळा प्रयत्न करूनही तिथे एकही आमदार निवडून येऊ शकलेला नाही. त्यामुळे गोव्यात शिवसेना-काँग्रेसची (ShivSena-Congress) आघाडी होईल असं मला वाटत नाही. असं मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मांडलं आहे.

Ramdas-Athawale
लसीकरणाबाबत भ्रम पसरवणाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडा; मोदींचं आवाहन

पुढे त्यांनी म्हटलंय की, भाजपला गोवा जिंकणे काहीही अशक्य नाहीये. तिकडे गोव्यात काँग्रेस मध्ये मोठी फूट पडलीय. गोव्यातील सर्वांच्या सर्व 40 जागांवर आरपीआयने भाजपला पाठिंबा दिलाय, असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पनवेलमध्ये केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.