Goa : शिवसेनेची पहिली यादी जाहीर; 10 ते 12 जागा लढणार

संजय राऊत यांनी यावेळी भाजपसह दलबदलू आमदारांवर निशाणा साधला.
Goa Election: Shivsena Declared Candidates List
Goa Election: Shivsena Declared Candidates ListTeam eSakal
Updated on

पणजी : आगामी काळातील विधानसभा निवडणुकांच्या (Goa Assembly Elections 2022) पार्श्वभूमिवर गोव्यात रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत शिवसेना (Shivsena) देखील दंड थोपटून मैदानात उतरली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या उपस्थितीत आज गोव्यात शिवसेनेनं पत्रकार परिषद घेतली आणि पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यापैकी 9 उमेदवारांची यादी आज सेनेनं जाहीर केली असून, गोव्यात शिवसेना 10 ते 12 जागा लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गोव्याच्या निवडणुकीसाठी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह सेनेचे बडे नेते प्रचारासाठी उतरण्याची शक्यता आहे. यावेळी संजय राऊत यांनी गोव्याच्या राजकारणावर परखड भाष्य केलं. (Goa Election: Shivsena Declared Candidates List)

Goa Election: Shivsena Declared Candidates List
उत्पल पर्रीकर अपक्ष लढणार, की केजरीवालांची ऑफर स्वीकारणार? लवकरच स्पष्ट

गोव्यात गेल्या काही वर्षांपासून, प्रस्थापित लोकांचं राजकारण सुरू आहे. यामध्ये आलेमाओ-गेलेमाओ वृत्तीच्या लोकांचा जास्त समावेश असल्याचं म्हणत त्यांनी दलबदलू आमदारांवर टीका केली. गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार असून, आणखी कुणाला सोबत यायचं असल्यास त्यांनी तसा प्रस्ताव दिल्यास विचार करू असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. तसंत महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही काँग्रेसला प्रस्ताव देण्यात आला होता असंही त्यांनी सांगितलं.(Goa Election: Shivsena Declared Candidates List)

Goa Election: Shivsena Declared Candidates List
मोन्सेरात यांच्यामुळे पडलं होतं मनोहर पर्रीकर यांचं सरकार

शिवसेनेनं जाहीर केलेली उमेदवारांची यादी.

  1. पेडणे - सुभाष केरकर

  2. म्हापसा - जितेश कामत

  3. शिवोली - विल्सेट परेरा

  4. हळदोणे - गोविंद गोवेकर

  5. पणजी - शैलेश वेलिंगकर

  6. पर्य़े - गुरुदास गावकर

  7. वास्को - मारुती शिरगावकर

  8. केपे - अ‍ॅलेक्स फर्नांडिस

  9. वाळपई - देवीदास गावकर

Goa Election: Shivsena Declared Candidates List
"आम्ही अमर जवान ज्योत पुन्हा पेटवू, काहींना बलिदानाचा अर्थ समजत नाही"

दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे सुपूत्र उत्पल पर्रीकर यांच्या उमेदवारीवरून गोव्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत उत्पल पर्रीकर यांच्या विरोधात आम्ही उमेदवार देणार नाही असंही राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()