''गोवा भाजपच्या मंत्र्याचा महिलेवर लैंगिक अत्याचार'', काँग्रेसचे गंभीर आरोप

congress,BJP
congress,BJPsakal
Updated on

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Goa CM Pramod Sawant) यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने आपल्या पदाचा गैरवापर करून एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे (Goa Congress) अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला. तसेच मुख्यमंत्र्यांनी संबंधित मंत्र्याविरोधात १५ दिवसात कारवाई करावी. तसे झाले नाहीतर काँग्रेस शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. आज ते पणजी येथील काँग्रेस सभागृहात बोलत होते.

congress,BJP
ममता बॅनर्जी बदलणार पक्षाचे नाव? लवकरच मोठ्या निर्णयाची शक्यता

''एका प्रतिष्ठीत व्यक्तीने २० दिवसांपूर्वी व्हिडिओ, ऑडिओ आणि व्हॉट्सअॅप चॅटचे पुरावे दिले होते. त्यावरून मंत्र्याने महिलेचे लैंगिक शोषण केले आहे, असं स्पष्ट होते. आम्हाला नैतिक जबाबदारीची जाणीव असल्याने त्या मंत्र्याचे नाव जाहीर करणार नाही. तसेच यामुळे मंत्री आणि संबंधित महिला अशा दोन्ही कुटुंबीयांची काहीही चूक नसताना बदनामी होईल. मंत्र्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही सरकारला 15 दिवसांची मुदत देत आहोत. या गुन्ह्यासाठी त्याला बडतर्फ करून गुन्हा दाखल करण्यात यावा. आता चेंडू डॉ प्रमोद सावंत यांच्या कोर्टात आहे, असे चोडणकर म्हणाले.

''मुख्यमंत्र्यांकडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न'' -

''संबंधित मंत्र्याला संरक्षण देण्यासाठी आणि पुरावा नष्ट करण्यसाठी मुख्यमंत्र्यांना देखील हे व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप दाखवण्यात आल्या होता. मुख्यमंत्र्यांनी हे पुरावे नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. मंत्र्यानी लैंगिक शोषणाचे पाप तर केलेच मात्र मुख्यमंत्र्यांनी महापाप केले. आम्ही यापूर्वी भ्रष्टाचाराच्या प्रकरणी शांत बसलो. मात्र, आता यांचे असे चाळे खपवून घेणार नाही. लैंगिक शोषण करताना पोलिसांचाही गैरवापर करण्यात आले. हे गोव्यातील लोकांना सांगताना मला अत्यंत दुःख होत आहे'', असंही चोडणकर म्हणाले.

''जवळपास २० दिवसांपूर्वी एक प्रतिष्ठीत व्यक्ती रेस्टॉरंटमध्ये भेटली होती. त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ दाखवला. त्यामध्ये संबंधित मंत्री तडजोड करताना दिसत आहे. तसेच महिलांविरोधात देखील आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली आहे. काहीही करून पळून जाऊ, असे मंत्र्याने महिलेला धमकावले असून तिला गर्भपात करण्यास भाग पाडले, असा गंभीर आरोप चोडणकर यांनी केला आहे. आम्ही सभ्यता दाखवत मुख्यमंत्र्यांना या मंत्र्यावर कारवाई करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देत आहोत. पंतप्रधान 19 डिसेंबरला गोव्यात येणार आहेत. त्याआधी सरकार योग्य ते काम करेल अशी आम्हाला आशा आहे. तसे झाले नाही तर त्यानंतर आम्ही दया दाखवणार नाही'', असा इशारा चोडणकर यांनी दिला आहे.

या नात्याला महिलेचे सहमती होत की नाही? असा प्रश्न विचारला असता चोडणकर म्हणाले, व्हिडिओवरून महिलेची कुठलीही सहमती नसल्याचं दिसतेय. मंत्र्याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या महिलेशी मी बोललो नाही किंवा भेटलो नाही असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, भाजपकडून हे सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले. ''कोणत्याही मंत्र्याविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार नाही. विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने काँग्रेसकडून बिनबुडाचे आरोप केले जातात. जर एखाद्या महिलेचे लैंगिक शोषण झाले असेल तर तक्रारदार करणे आवश्यक आहे. कोणत्याही पुराव्याशिवाय असे आरोप करणे चुकीचे आहे. पुरावा असला पाहिजे आणि नसला तरीही, ज्या महिलेचे शोषण झाले आहे त्यांनी तक्रार केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांसह 12 मंत्री गोवा सरकारमध्ये आहेत. आम्ही कोणावर संशय घ्यावा? मुख्यमंत्र्यांनाही याबाबत काहीच माहिती नाही. कोणत्याही पोलिस ठाण्यात तक्रार नाही'', असंही तानावडे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()