गोवा भाजपत धुसफूस? उत्पल पर्रिकर, फडणवीसांमध्ये तू तू-मै मै!

गोव्याच्या विधानसभा निवडणुकीला आता चांगलाच रंग चढायला लागला आहे.
Utpal Parrikar_Devendra Fadnvis
Utpal Parrikar_Devendra Fadnvis
Updated on

पणजी : Goa Assembly Elections : गोव्याच्या विधानसभा निवडणुकीला आता चांगलाच रंग चढायला लागला आहे. विविध पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर होत आहेत तर विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायला लागल्या आहेत. पण गोवा भाजपमध्ये (Goa BJP) धुसफूस पहायला मिळत आहे. कारण आजवर गोव्याचे कारभारी म्हणून ओळखले गेलेले भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) आणि भाजपचे गोव्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्यामध्ये शाब्दिक वाद सुरु असल्याचं चित्र आहे. (Goa Election Allegations between Utpal Parrikar and Devendra Fadnavis)

Utpal Parrikar_Devendra Fadnvis
सेटवर महिला सहकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याने मानेंना काढलं; वाहिनीचा खुलासा

उत्पल पर्रिकर हे पणजी येथून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. दरम्यान, उत्पल पर्रिकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये शाब्दिक वाद सुरु झाला आहे. उत्पल यांच्या निवडणूक लढवण्याच्या मागणीवर फडणवीसांनी म्हटलंय की, "उत्पल केवळ मनोहर पर्रिकर यांचा किंवा इतर नेत्याचा मुलगा असल्यानं तिकिट देण्यास योग्य समजलं जाणार नाही"

Utpal Parrikar_Devendra Fadnvis
कोरोना लसीकरणाला एक वर्ष पूर्ण; भारतीयांनी घेतले 156.76 कोटी डोस

फडणवीसांच्या या वक्तव्यावर आता उत्पल पर्रिकर यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, "गोव्यात ज्या प्रकारंचं राजकारण सुरु आहे ते मी सहन करु शकत नाही. फडणवीसांना असं म्हणायच का? की जिंकण्याची क्षमता असणं म्हणजेच चांगला उमेदवार आहे? संबंधित व्यक्तीच्या चरित्र्याचं काहीही महत्व नाही का? त्यातच आता आपण एका अशा व्यक्तीला तिकीट देत आहात, ज्याचा गुन्हेगारी इतिहास आहे आणि आम्हाला गुपचूप घरी बसायचं आहे. जर भाजप पणजी मतदारसंघातून विद्यमान आमदार अतानासियो मोनसेरेट यांना तिकीट दिलं तर मी गप्प बसणार नाही"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.