नवी दिल्ली- 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, तरी गोवा अजून पोर्तुगालच्याच अधिपत्याखाली होता. 19 डिसेंबर 1961 साली भारतीय सैन्याने केलेल्या ऑपरेशनमुळे गोवा भारतामध्ये सामील झाला. या ऑपरेशनमध्ये भूदल, वायूदल आणि नौदलाने भाग घेतला होता. या कारवाईला 'ऑपरेशन विजय' असं नाव देण्यात आलं होता. 30 मे 1987 साली गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला, तर दीव आणि दमनला केंद्रशासित प्रदेश करण्यात आलं. 'गोवा मुक्ती दिवस' दरवर्षी 19 डिसेंबरला साजरा केला जातो.
पोर्तुगीज भारतात 1510 साली आले होते. त्यांनी गोव्यावर 451 वर्ष राज्य केलं. या काळात गोव्याला‘वाइस किंगडम’चा दर्जा देण्यात आला होता. येथील नागरिकांना पोर्तुगालमध्ये असलेल्या नागरिकांसारखेच अधिकार होते. भारतासाठी गोवा महत्वाचा होता. आकाराने छोटा असला तरी हे मोठे ट्रेड सेंटर होते. मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे अनेक शासकांचे याकडे लक्ष आकर्षित झाले होते. भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गोव्याला भारतात सामील करुन घेण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरु यांनी गोव्यातील पोर्तुगालची उपस्थिती मान्य नसल्याचं म्हटलं होतं. पोर्तुगालने हे प्रकरण आंतराराष्ट्रीय कोर्टात नेण्याचा खूप प्रयत्न केला.
भारतीय सैन्याने संयुक्त राष्ट्राच्या वाहनावर हल्ला केला; पाकिस्तानचा गंभीर आरोप
समाजवादी नेते डॉ. राममनोहर लोहिया, जनसंघचे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांसारख्या नेत्यांनी गोव्याच्या मुक्तीचा प्रश्न मोठा केला. 1946 मध्ये केवळ आरामासाठी गोव्यात गेलेल्या राम मनोहर लोहिया यांना तेथील अराजकता न बघवल्याने त्यांनी गोव्यातील पोर्तुगीज राजवटीविरोधात बंड करण्याचा निर्णय घेतला. काही काळासाठी तेथे संघटन करून त्यांनी कामही केले. त्यांना गोव्यात एकदा तुरुंगवासही सहन करावा लागला होता. परंतु, त्यांनी शेवटपर्यंत गोव्यात आंदोलने उभी करण्यासाठी संघटन केले.
भारत स्वतंत्र झाल्यामुळे गोव्यात बंडखोरांचा जोर वाढला होता. यात 'आझाद गोमंतक दल'चा विशेष उल्लेख करावा लागेल. विश्वनाथ लवांडे, नारायण हरी नाईक, दत्तात्रय देशपांडे, प्रभाकर सिनारी यांनी याची स्थापना केली होती. या चौघांना पोर्तुगीजांनी अतिशय छळले. त्यांच्यापैकी काहींना तर आफ्रिकेतील अंगोला तुरुंगात डांबण्यात आले. मात्र, विश्वनाथ लवांडे आणि प्रभाकर सिनारी यांनी तुरुंगातून पळ काढत पुढे अनेक क्रांतिकारी कारवाया केल्या.
बंगालपासून ते गुजरातपर्यंत सगळीकडूनच गोवा मुक्ती संग्राम आंदोलनाला पाठिंबा मिळू लागला. महाराष्ट्रामधूनही अनेक नेत्यांनी सक्रिय सहभाग घेत आंदोलनाला बळ दिले. त्यात प्रामुख्याने मधू लिमये, एस एम जोशी या नेत्यांचा समावेश करावा लागेल. मधु लिमये यांना1955 ते 1957 या दोन वर्षांसाठी तुरुंगवास भोगावा लागला. भारत सरकारने गोव्यावर आर्थिक निर्बंध आणले होते. मात्र, फ्रान्स पाकिस्तान, श्रीलंका येथून मिळत असलेल्या मदतीमुळे त्यांना भारतावर फार अवलंबून राहावे लागले नाही.
कोरोनात एक्स्ट्रा मॅरिटल App वर भारतीयांच्या उड्या; ओलांडला 13 लाखांचा टप्पा
1961दरम्यान आंदोलने अधिक पेटायला लागली. अखेर भारत सरकारने 17 डिसेंबर रोजी 'ऑपरेशन विजय' राबवून मोहिमेला हात घातला. 30 हजार सैनिकांची फौज असलेल्या या मोहिमेत नौदल आणि वायुदलानेही भाग घेतला. पुढच्या 36 तासांमध्ये म्हणजेच 19 डिसेंबर 1961ला गोवा पोर्तुगीजांपासून मुक्त झाले. यासाठी शेकडो आंदोलकांचे प्राण वेचावे लागले होते. गोव्यातील जनतेला भारताच्या स्वातंत्र्यानंतरही साडे चौदा वर्षे झगडावे लागले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.