Goa Murder Case : कफ सिरप पाजलं, उशीने दाबलं तोंड.. मुलाचा खून होता पूर्वनियोजित! चिमुरड्यावर पार पडले अंत्यसंस्कार

हॉटेलमधील खोलीत खोकल्याच्या औषधाच्या दोन रिकाम्या बाटल्या गोवा पोलिसांना सापडल्या. यामुळे हा पूर्वनियोजित खून होता, असे एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले.
Murder Case
Murder Caseesakal
Updated on

CEO Kills 4 year old Son : बंगळुरूतील सूचना सेठ या महिला सीईओने आपल्याच चार वर्षांच्या मुलाचा गोव्यामध्ये खून केला होता. यासाठी तिने आपल्या मुलाला खोकल्याच्या औषधाचा ओव्हरडोस दिला होता असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. उत्तर गोव्यातील कंडोलिममधील सोल बनयान ग्रांडे या हॉटेलमधील खोलीत खोकल्याच्या औषधाच्या दोन रिकाम्या बाटल्या गोवा पोलिसांना सापडल्या. यामुळे हा पूर्वनियोजित खून होता, असे एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले.

सूचना सेठ (Suchana Seth) हिने तिच्या चार वर्षांच्या मुलाचा गळा किंवा तोंड दाबल्याने, श्‍वास कोंडून त्याचा मृत्यू झाल्याचे डॉ. कुमार नाईक यांनी सांगितले. गोव्यातील म्हापसा न्यायालयाने सूचनाला सहा दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. (Goa Murder Case Update)

कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथील हिरीयूर तालुका रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. नाईक यांनी सूचनाच्या मृत मुलाचे शवविच्छेदन काल केले. ते म्हणाले, ‘‘मुलाचा मृत्यू ३६ तासांआधी झाला होता. त्याचा गळा दाबून किंवा कापड किंवा उशीने तोंड दाबल्याने श्‍वास कोंडून खून केला आहे. मुलाच्या शरीरातून रक्त वाहिल्याच्या किंवा झटापट झाल्याच्या कोणत्याही खुणा नव्हत्या.’’

Murder Case
CEO Kills Son : गोव्यात ४ वर्षांच्या मुलाची आईनेच केली हत्या अन्.. स्टार्टअप कंपनीच्या सीईओला फिल्मी स्टाईलने अटक!

दरम्यान, सूचनाचे पती वेंकट रमण हे इंडोनेशियातून भारतात परत आले. त्यांनी चित्रदुर्गला जाऊन पोस्टमार्टमची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर मुलाचा मृतदेह आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर राजाजी नगर येथील हरिश्चंद्र घाटावर या चिमुरड्यावर अंत्यसंस्कार पार पडले. (Suchana Seth Case)

सूचनाने केला होता आत्महत्येचा प्रयत्न

मुलाचा खून केल्यानंतर सूचनाने धारदार शस्त्राने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. शस्त्रामुळे कापल्याने खोलीत सांडलेले रक्ताचे डाग हॉटेलमधील सफाई कर्मचाऱ्याला आढळले होते. खुनापूर्वी सूचनाने मुलाचे मत्स्यालयाशेजारी खेळतानाचे छायाचित्र इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.