गोव्याला जायचा प्लॅन आहे? प्रवाशांसाठी नवे नियम जारी

Restrictions In Goa
Restrictions In Goa esakal
Updated on

पणजी : अनेकांचा नवीन वर्षासाठी किंवा ३१ डिसेंबरसाठी गोव्याला जायचा प्लॅन (Goa Tour Planing) असले. तुम्ही जर गोव्याला जाणार असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कोरोनाची रुग्णसंख्या (Goa Corona Cases) वाढत असल्यामुळे गोवा सरकारने नवे निर्बंध (Restrictions In Goa) लागू केले आहेत. दुसऱ्या राज्यातून प्रवास करणाऱ्या नागरिकांवर देखील काही निर्बंध लावण्यात आले आहेत.

Restrictions In Goa
गोव्याला जाताय? या पाच ठिकाणी नक्की भेट द्या...

गोव्यात काय निर्बंध -

कॅसिनो, सिनेमा हॉल, ऑडिटोरियम, रिव्हर क्रूझ, वॉटर पार्क आणि एंटरटेनमेंट पार्कमध्ये क्षमतेच्या ५० टक्के लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. तसेच पूर्ण लसीकरण झालेल्या लोकांनाच याठिकाणी प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच तुम्हाला जर गोव्यात जायचे असेल तर तुमच्याकडे कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणं गरजेचं आहे. तसेच लसीकरण देखील पूर्ण होणं गरजेचं आहे.

गोव्यात रुग्णसंख्या वाढतेय -

गेल्या आठवड्यापासून गोव्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. पॉझिटिव्हीटी रेट ४.०३ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच या महिन्यातील सर्वाधिक रुग्ण मंगळवारी आढळून आले. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. सध्या ओमिक्रॉनचा एकच रुग्ण आढळून आला आहे. पण, युके आणि जर्मनीवरून लोक येत असल्यामुळे गोव्यातील रुग्णसंख्या वाढत असल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितलं होतं. पण, गोव्याची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे. तसेच आता ख्रिसमसच्या सुट्ट्या, ३१ डिसेंबर आणि नवीन वर्ष अशा सुट्टया घालविण्यासाठी पर्यटक गोव्यात गर्दी करतात. त्यामधून गोवा सरकारला उत्पन्न मिळतं. त्यामुळे जास्त कठोर निर्बंध लागू करणार नाही, असं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितलं होतं. मात्र, आता रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचं पाहून सरकारने काही निर्बंध घोषित केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()