Gold ATM In Hyderabad : एटीएममधून पैशांसोबतच आता सोनंदेखील बाहेर पडणार आहे असे सांगितलं तर अनेकांना विश्वास बसणार नाही. मात्र, देशात आता असं एटीएम बसवण्यात आले आहे. ज्याचा वापर सोने खरेदीसाठी केला जाणार आहे.
हेही वाचा: शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....
सोन्याची विक्री करणारे हे एटीएम हैद्राबादमध्ये गोल्डसिक्का कंपनीकडून बसवण्यात आले आहे. डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या सहाय्याने ग्राहक सोन्याची नाणी खरेदी करू शकणार आहेत. या एटीएमसाठी गोल्डसिक्का कंपनीने स्टार्टअप कंपनी Opencube Technologies Pvt Ltd सोबत सहकार्याचा करार केला आहे.
देशभरात बसवले जाणार गोल्ड एटीएम
हैद्राबाद येथे सुरू करण्यात आलेले अशा प्रकारची एटीएम सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात सुरू करण्याचा मानस कंपनीचा आहे. हे एटीएमदेखील आताच्या एटीएमप्रमाणे २४*७ कार्यरत असेल. याच्या मदतीने ग्राहक डेबिट आणि क्रेडिट कार्ड व्यतिरिक्त प्रीपेड आणि पोस्टपेड स्मार्ट कार्डच्या माध्यमातूनही सोने खरेदी करू शकणार आहे.
असे केले जाणार मशीनचे संरक्षण
मशीनच्या सुरक्षेबाबत कंपनीने सांगितले की, मशिनमध्ये इनबिल्ट कॅमेरा, अलार्म सिस्टीम, एक्सटर्नल सीसीटीव्ही कॅमेरे यासारख्या सुरक्षेसंबंधीचे उपकरणे देण्यात आली आहे. याशिवाय ग्राहकांच्या सोयीसाठी एक टीम देखील असणार आहे. कोणताही ग्राहक त्याच्या बजेटनुसार येथून सोने खरेदी करू शकेल. गोल्ड एटीएममध्ये सध्याच्या बाजार भावाप्रमाणेच व्यापार केला जाणार असून, या एटीएमच्या माध्यमातून 0.5 ग्रॅम ते 100 ग्रॅमपर्यंत सोने खरेदी करता येणार आहे.
आलू डालो सोना निकलेगा
काही दिवसांपूर्वी राहुल गांधींचा एडिट केलेला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये ते आलू डालो सोना निकलेगा बोलताना दिसून आले होते. त्यानंतर आता एटीएममधून पैशांऐवजी सोनं विकत घेता येणार आहे. त्यामुळे राहुल गांधींचा डायलॉग या निमित्ताने खरा होतांना दिसत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.