‘युवा’ लेखकांना सुवर्णसंधी; स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्राचा विशेष प्रकल्प

‘युवा’ लेखकांना सुवर्णसंधी; स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्राचा विशेष प्रकल्प
Updated on

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने ३० वर्षांच्या आतील युवा लेखकांना मेंटॉर, प्रोत्साहनकर्ते किंवा मार्गदर्शक उपलब्ध करून देऊन नवीन पिढीत दर्जेदार लेखक घडविण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. बहुपेडी प्रतिभा लाभलेले तरुण लिहिते व्हावे या उद्देशाने ‘युवा’ योजना सुरू केली जाणार आहे.

शिक्षण मंत्रालयाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त युवा लेखकांच्या लेखनगुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्याकडून पुस्तके लिहून घेण्यासाठी ही योजना आजपासून सुरू करण्यात आली आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी केंद्र सरकारच्या निकषांवर उतरणारी दर्जेदार युवा लेखकांची पहिली फळी समोर आणण्याचे केंद्राने ठरविले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (इंडिया@७५) हा प्रकल्प राबवण्यात येणार असून ७५ युवा लेखकांची ७५ पुस्तके २०२२ च्या स्वातंत्र्यदिनापर्यंत प्रकाशित करण्यात येतील. मान्यताप्राप्त २२ भारतीय भाषांमधील मेंटॉर, प्रोत्साहनकर्ते लेखकांची निवड केली जाणार आहे.

‘युवा’ लेखकांना सुवर्णसंधी; स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्राचा विशेष प्रकल्प
लसपुरवठ्याचं ऑडिट करा; कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते चिदंबरम यांची मागणी

७५ पुस्तकांचे लिखाण

विविध भारतीय भाषांमधील ज्येष्ठ श्रेष्ठ आणि नामवंत लेखकांनी ७५ युवा लेखकांना मार्गदर्शन तसेच प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित आणि विविध ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसेनानींच्या जीवनावरील किमान ७५ पुस्तके लिहून घ्यायची आहेत. या लेखकांच्या निवडीसाठी १ जून रोजी देशपातळीवर लेखन स्पर्धा घेण्यात येणार आहे आणि स्वातंत्र्यदिनी तिचा निकाल घोषित होईल. या लेखकांनी ही दर्जेदार साहित्यनिर्मिती येत्या डिसेंबरपर्यंतच पूर्ण करायची आहे.

‘युवा’ लेखकांना सुवर्णसंधी; स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्राचा विशेष प्रकल्प
मोदी सरकारची मोठी घोषणा! कोरोनाकाळात अनाथ झालेल्या मुलांसाठी नवीन योजना

ज्येष्ठांचे मार्गदर्शन

पुढील वर्षी १२ जानेवारीला म्हणजे राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येईल. ही पुस्तके लिहिण्यासाठी निवड झालेल्या युवा लेखकांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची पाठ्यवृत्ती देण्यात येईल. प्रत्येकी एका भाषेतील एका ज्येष्ठ लेखकाची प्रोत्साहनकर्ते किंवा मेंटॉर म्हणून निवड करण्यात येईल. नामवंत लेखकांनी या नवलेखकांना ५००० शब्दांच्या लेखाचे ७५ ते १०० पानी पुस्तक लिहिण्याइतके मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे.

मराठीला संपादकच मिळेना

राष्ट्रीय पुस्तक न्यास म्हणजेच ‘एनबीटी’तर्फे या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याची जबाबदारी ‘एनबीटी’ने त्या त्या भाषेतील संपादकांवर टाकली आहे. ‘एनबीटी’मध्ये विविध भाषांचे संपादक आहेत. मात्र गेली अनेक वर्षे ‘एनबीटी’मध्ये मराठीसाठी कायमस्वरूपी संपादकच नाही.मराठी भाषेतील पुस्तकांच्या संपादन व प्रकाशनासाठी अजूनही करार स्वरूपावरच नियुक्ती केली जाते. हे काम करणाऱ्यांना संस्थेच्या अधिकाऱ्यांकडून अंतर्गत कागदपत्रांत संपादकऐवजी सल्लागार असाच त्यांचा उल्लेख केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.