खूशखबर! रेल्वेत उद्यापासून पुन्हा सुरु होणार खानपान सेवा

कोविड काळात रेल्वे प्रवासादरम्यान बंद करण्यात आलेली जेवणाची सुविधा पुन्हा सुरु होणार आहे.
Railway Pantry service
Railway Pantry service
Updated on

नवी दिल्ली : देशभरात कोविडचा संसर्ग कमी होत असल्यानं गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेली रेल्वे प्रवासातील जेवणाची सुविधा पुन्हा एकदा सुरु होणार आहे. रेल्वे मंत्रालयानं (Ministry of Railways) याची माहिती दिली असून उद्या पासून अर्थात १४ फेब्रुवारीपासून प्रवाशांना रेल्वेतील जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे. (Good news for railway passengers Pantry service will resume from 14 february)

रेल्वे मंत्रालयानं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, देशभरातील कोविड संबंधित निर्बंध शिथिल करण्याच्या अनुषंगाने आणि प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन भारतीय रेल्वेकडून १४ फेब्रुवारीपासून पॅन्ट्री कारसह (Railway Pantry Car) शिजवलेल्या अन्नाची सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

Railway Pantry service
आण्णा हजारेंनी वाईनविक्रीला विरोध करु नये; द्राक्षे उत्पादकांची मागणी

देशात अद्यापही पूर्ण क्षमतेनं रेल्वे सेवा सुरु झालेली नाही. मात्र, कोविडच्या नियमांचे पालन करुन मर्यादित स्वरुपात देशभरात रेल्वे सुरु झाल्या आहेत. यामुळं एकीकडे रेल्वे प्रवाशांची संख्या वाढत असताना लांबच्या प्रवासादरम्यान त्यांचे जेवणाचे हाल होत आहेत. त्यामुळंच रेल्वे प्रवाशांकडून पुन्हा एकदा जेवणाची सुविधा सुरु व्हावी अशी मागणी रेल्वे मंत्रालयाकडे करण्यात येत होती. प्रवाशांच्या या मागणीला रेल्वेनं सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.