"वैज्ञानिकदृष्ट्या चांगला निर्णय", लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवल्याचं पूनावालांकडून स्वागत

अदर पूनावाला यांची सीरम इन्स्टिट्यूटच कोविशिल्ड या लसीचं उत्पादन करत आहे.
adar poonawalla
adar poonawallafile photo
Updated on

नवी दिल्ली : कोविशिल्डच्या (covishield) दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवड्यांनी वाढवल्याच्या केंद्र सरकारच्या (central government) निर्णयाचं सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी स्वागत केलं आहे. दोन डोसमधील अंतर वाढवल्याचा निर्णय वैज्ञानिकदृष्ट्या चांगला आहे, असं पूनावाला यांनी म्हटलं आहे. पूनावाला यांची सीरम इन्स्टिट्यूटच (Serum Institute of India) कोविशिल्ड लसीचं उत्पादन करत आहे. (Good Scientific Decision says Adar Poonawalla on new policy of two Jabs of covishield)

adar poonawalla
"देशात लसींचा तुटवडा आहे मग आम्ही फाशी घ्यावी का?"; केंद्रीय मंत्री भडकले

हा निर्णय लसीची कार्यक्षमता आणि रोगप्रतिकारकशक्ती या दोन्हींबाबत फायदेशीर आहे. सरकारनं घेतलेला हा निर्णय चांगला आहे कारण नव्या अभ्यासांनुसार, लसीची कार्यक्षमता ही दोन डोसमधील अंतर १२ आठवडे किंवा त्यापेक्षा अधिक असले तर ८१.३ टक्के असते. दोन डोसमधील अंतर सहा आठवड्याचं असेल तर ही कार्यक्षमता ५५.१ टक्के इतकीच असते, असं पूनावाला यांनी एनडीटीव्हीशी बोलताना म्हटलंय.

adar poonawalla
Corona Vaccine: भारतात तयार होतेय अधिक कार्यक्षम लस; IISCचं संशोधन सुरु

युकेमधील कोरोनावर काम करणाऱ्या एका ग्रुपने कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवड्यांनी वाढवण्याची शिफारस केली होती. पीटीआय या वृत्तसंस्थेनं या ग्रुपला कोट करुन याबाबत माहिती दिली आहे. फेब्रुवारीमध्ये WHO मध्ये संशोधक सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटलं होतं की, "अॅस्ट्राझेनका दुसरा डोस घेण्यास उशीर होत असताना त्याची परिणामकारकता वाढत आहे" अॅस्ट्राझेनेकाचं भारतातलं नाव कोविशिल्ड असं आहे.

adar poonawalla
लसींच्या तुटवड्यामुळे दोन डोसमधील अंतर वाढणार का?; काँग्रेसचा सवाल

लसीकरणाच्या सुरुवातीला कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर चार ते सहा आठवड्यांचं होतं. त्यानंतर ते वाढवून सहा ते आठ आठवडे करण्यात आलं. आता आज (दि.१३) झालेल्या निर्णयानुसार, कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवडे असणार आहे. दरम्यान, काँग्रेसने सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. या निर्णयाला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही तर लसींचा तुटवडा असल्यानं सरकारनं हा निर्णय घेतल्याचा आरोप काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()