सातारा : एक वर्षानंतरही कोरोनाव्हायरसचे भारतात प्रमाण वाढू लागले आहे. आता या व्हायरसचा दुस-या टप्यात तर सुनामी सारखा सामना करावा लागत आहे. ऑक्सिजनची कमतरता, रुग्णालयात बेडची कमतरता आणि महत्वाची औषधे ही आरोग्य सेवा कर्मचा-यांना भेडसावणारी माेठी समस्या आहे. ही केवळ एखाद्या राज्यातील समस्या नसून राष्ट्रीय समस्याच म्हणावी लागले. आराेग्य कर्मचारी सतत मृत्यू, असंतुष्ट नातेवाईक आणि तणावग्रस्त कुटुंबे, गर्दीने भरलेली रुग्णालये, दीर्घ कामकाजाचे तास आणि अगदी भीषण आगीने वेढलेले रुग्णालयात देखील कार्यरत आहेत.
नर्स, डॉक्टर, संशोधक आणि इतर आरोग्य सेवा कामगारांना शतशः नमन केले पाहिजे. जे नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या मर्यादित स्त्रोतांसह उत्तमोत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी चोवीस तास कार्यरत आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी, गुगलने (google) भारतासाठी एक विशेष गुगल डूडल (GOOGLE DOODLE) तयार केले, ज्याने वैद्यकीय (वैज्ञानिक) समाजातील सर्व सार्वजनिक आरोग्य कर्मचारी आणि संशोधकांचे आभार मानलेत.
मोहिते-पाटलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढ; युवतीने धुडकावली Offer
काेविड याेध्यांसाठी (वॉरियर्सचे) गुगलने आज आपल्या खास डूडल द्वारे साकारले आहे. या डूडल मधून गुगलने वॉरियर्सचे विशेष आभार मानले आहेत. तुम्ही जर गुगल ओपन केले तर तुम्हाला गुगल एका नवीन अंदाजात दिसेल. गुगलमधील आधीचे G ला दोन पाय दिसत आहेत. दुसऱ्या o आणि G च्या वरुन लाल रंगाचे दिल (हार्ट) E वर पाेस्ट केले जात आहे. E चे स्वरुप देखील पूर्णपणे बदललेले दिसत आहे. याशिवाय, गुगलने लिहिले आहे To all the public health workers and to researchers in the scientific community, thank you.
तुम्ही जर गुगलवर क्लिक केले की गुगल सर्च बारमध्ये thank you coronavirus helpers लिहिलेले एक नवीन पेज ओपन होते. यावेळेचे डूडल त्या डॉक्टरांना आणि आराेग्य कर्मचा-यांसाठी आहे. जे आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांचा जीव वाचवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेत आहेत. या डूडलच्या माध्यमातून डॉक्टर आणि कर्मचा-यांना त्यांच्या कामांसाठी गुगलने खास थँक्यू म्हटले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.