‘गोपालपुरम‘ला भेट देण्याचे स्वप्न साकार ; सहा दशकांपूर्वी करुणानिधी यांना विकले होते घर

‘गोपालपुरम रेसिडेन्सी’ म्हणजे तमिळनाडूच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचे केंद्र
Gopalapuram Residency is important center politics Tamil Nadu M Karunanidhi
Gopalapuram Residency is important center politics Tamil Nadu M Karunanidhisakal
Updated on

चेन्नई : ‘गोपालपुरम रेसिडेन्सी’ म्हणजे तमिळनाडूच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचे केंद्र. द्रमुकचे सर्वेसर्वा दिवंगत एम करुणानिधी यांचे निवासस्थान. ब्राह्मण विरोधी नेता अशी ओळख असणाऱ्या करुणानिधी यांनी १९५० साली सर्वेश्वरा अय्यर या एका तमिळी ब्राह्मणाकडून हे घर विकत घेतले तेव्हा तत्कालीन काळात जोरदार चर्चा झाली होती. या घराचा व्यवहार झाल्यानंतर अय्यर यांची नात सरोज यांचे लग्न ठरले. अय्यर यांना नातीचे लग्न त्या घरातच करायचे होते, त्यामुळे अय्यर यांनी दोन महिने अधिक कालावधी मागितला आणि करुणानिधी यांनी तो दिला. याच ऋणानुबंधांचा पुनःप्रत्यय अय्यर कुटुंबाने ६७ वर्षांनी पुन्हा घेतला.

अमेरिकेत स्थायिक झालेल्या सरोज सीतारमन यांना आपल्या आजोबांचे घर पुन्हा पाहण्याची इच्छा झाली. परंतु आता त्या घरात तमिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन हे राहतात. त्यामुळे सरकारी शिष्टाचार आणि नियम यांमुळे आपल्याला हे घर पुन्हा पाहायला मिळेल की नाही अशी धाकधूक सरोज यांना होती. मात्र त्यांच्या मुलीने तमिळनाडू मुख्यमंत्री कार्यालयाशी याबाबत पत्रव्यवहार केला आणि आश्चर्य म्हणजे स्टॅलिन यांनी सरोज यांची विनंती मान्य केली. अय्यर कुटुंबाला रविवारी (ता. २८) गोपालपुरम रेसिडेन्सीला भेट देण्याचा योग आला. विशेष म्हणजे स्टॅलिन यांनी स्वतः सरोज आणि अय्यर कुटुंबाचे स्वागत करत घर दाखवले. मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा पाहुणचार पाहून अय्यर कुटुंब भारावून गेले. सरोज यांनी यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देत स्टॅलिन यांचे आभार मानले.

देवघराच्या जागी पुस्तके

गोपालपुरम रेसिडेन्सीला ६७ वर्षानंतर भेट देणाऱ्या सरोज यांनी सर्व घर फिरून पाहिल्यानंतर सांगितले की, गोपालपुरममध्ये फारसे बदल झालेले नाहीत, मात्र पूर्वी जिथे देवघर होते तिथे आता पुस्तके आहेत. बाकी सर्व घर हे अगदी सुव्यवस्थित ठेवले असल्याचे सरोज म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.