Gopinath Munde Birth Anniversary : गोपिनाथ मुंडेंमूळे अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला पळता भुई थोडी झाली!

अडरवर्ल्डजगताच्या कचाट्यातून मुक्त होऊन गोपिनाथ मुंडे यांनी नवा सुर्य मुंबईला दाखवला.
Gopinath Munde
Gopinath MundeEsakal
Updated on

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांपैकी एक होते. 1995 ते 1999 या काळात ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीही होते. उपमुख्यमंत्रीपद भूषवताना त्यांनी गृहखात्याची जबाबदारीही सांभाळली. एका सामान्य उसतोड मजूराचा मुलगा ते केंद्रीय ग्रामविकास मंत्री असा त्यांचा राजकीय आलेख नेहमी चढताच राहिला. त्यांची आज ७३ वी जयंती आहे. ते आज आपल्यात नसले तरी आजही त्यांच्या स्मृती आठवताना अनेक बड्या नेत्यांचेही डोळे पाणावतात.

९० च्या दशकात मुंबईला गुंडगिरी आणि टोळी युद्धाने ग्रासले होते. मुंबईत १९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची भीती वाढली होती. मुंबईत रोज टोळीयुद्ध होऊ लागले. दाऊदच्या नावाने लोकांकडून खंडणी मागितली जात होती. मुंबईत गुंडांबरोबरच गुन्ह्यांमध्येही वाढ झाली होती. मुंबईच्या गल्लोगल्लीत रक्ताचे पाठ वहायचे. यात फक्त गुंडांचच नाही तर खंडणीला बळी पडलेले बिल्डर, नेते आणि बॉलीवूड सेलिब्रेटींचाही जीव गेला होता. यावर पुर्ण विराम लावायचं काम केलं महाराष्ट्रातल्या एका जिगरबाज गृहमंत्र्यानं, नाव दिवंगत गोपीनाथराव मुंडे.

१९९५ साली शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले, तेव्हा भाजपचे गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. गृहमंत्री होताच त्यांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि दाऊदचा खात्मा करण्याचे कडक आदेश पोलिसांना दिले होते. त्यांनी मुंबई पोलिसांना मुंबईतील गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी ‘फ्री हँड’ दिला होता. त्याचे आदेश निघताच संपूर्ण अंडरवर्ल्ड हादरले आणि दाऊद भारत सोडून दुबईत स्थायिक झाला.

Gopinath Munde
'बळी दिलेल्या रेड्यांचा तळतळाट चंद्रकांत पाटलांना लागला असेल, अन्यथा त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला नसता'

८० आणि ९० च्या दहशकात बॉलीवडचे अनेक चेहरे प्रसिद्धीझोतात होते. त्यांच्या मागे लाखो करोडो लोक दिवाणे होते, मुंबईत मात्र त्यांना घराच्या बाहेर पाऊल ठेवण्याची भिती होती. त्याकाळात बॉलिवूडला, उद्योजकांना अंडरवर्ल्डची भीती होती. मुंबई जणू ठप्प होती. हे चित्र बदलायचा वीडा मुंडेंनी उचलला. त्यावेळी सिनेसृष्टीसह अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, रवि पुजारा, भरत नेपाळी, छोटा शकील यांच्या टोळींचे धमकी वजा फोन प्रतिष्ठीत नागरिकांना यायचे. खंडणी वसुलीसाठी.

Gopinath Munde
Viral Video : मराठी लग्न, इंग्रजीत मंगलाष्टके अन् शुभमंगल सावधान!

ग्लॅमरसाठी अनेक अंडरवर्ल्ड डॉन आणि त्यांच्या टोळीतल्या गुंडांच्या पार्ट्यांमध्ये सिनेजगतातले अनेक प्रतिष्ठीत स्टार असायचे. अंडरवर्ल्डने राजकारण आणि पोलिसांच्या नाकात दम केला होता. पोलिसांचे व्यवस्थेने बांधलेले हात सोडवण्याची गरज होती. या काळात राजकारण, समाजकारणासोबत या गुंडांची दहशत हटवण्याची गरज होती. हे काम गोपिनाथ मुंडे यांनी बरोबर केले.

Gopinath Munde
गोव्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाला 'या' दिवंगत नेत्याचं नाव, PM मोदींनी केलं उद्घाटन; जाणून घ्या खासियत

गोपीनाथ राव मुंडेंनी गृहखातं ताब्यात घेतलं आणि पहिला आदेश पोलिसांना दिला. तो म्हणजे, मुंबई साफ करण्याचा. कारण, अडरवर्ल्ड जगताशी मुंडें यांचा काहीच तसुभर संबंध नव्हता. त्यांनी ४० हजार पोलिस कर्मचाऱ्यांना माफियांचा खात्म करण्यासाठी लागणारे सर्व अधिकार दिले. पोलिस विरुद्ध माफिया या चकमकी ९० च्या दशकात जनतेसाठी सामान्य झाल्या होत्या. याच काळात इन्काउंटर स्पेशिलीस्ट दया नायक, विजय साळसकर अशी इतर नावं मुंबई पोलिस दलात मोठी झाली.

Gopinath Munde
Gopinath Munde Anniversary: कागदावरची आकडेमोड कधी मैत्रीच्या आड आली नाही, किस्सा युतीचा

या कारवाईने माफिया जगत तर पुरते हादरून गेले. वाट मिळेल तिकडे हे लोक लपून बसायला लागले. अशातच अडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम पसार झाला तो आजतागायत कोणाला दिसला नाही. अशी या मुंबईच्या गृहमंत्र्याची दहशत होती. या सर्व गोष्टींनंतर मुंबई सावरायला सुरूवात झाली. अडरवर्ल्डजगताच्या कचाट्यातून मुक्त होऊन गोपिनाथ मुंडे यांनी नवा सुर्य मुंबईला दाखवला. अशा या लढवैय्या नेत्याने ३ जून २०१४ मध्ये अकेरचा श्वास घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.