‘सिंगल युज प्लॅस्टिक’वर सरकारची फुली; पुढील वर्षी जुलैपासून अंमलबजावणी

plastic bab
plastic babPix_Pratik
Updated on

नवी दिल्ली : देशात एकदा वापरल्यावर टाकून दिल्या जाणाऱ्या (सिंगल युज) प्लॅस्टिकच्या वस्तूंवर पुढील वर्षी, १ जुलै २०२२ पासून संपूर्णपणे बंदी लागू केली जाणार आहे. पॉलिथिन पिशव्यांच्या प्लॅस्टिकची जाडी ५० मायक्रॉनवरून १२० मायक्रॉनपर्यंत वाढविण्याचा निर्णयही यंदा ३० सप्टेंबरनंतर दोन टप्प्यांत लागू करण्यात येईल. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने आज याबाबतची अधिसूचना जारी केली.

देशात प्रचंड प्रमाणात वाढत जाणाऱ्या प्लॅस्टिक कचऱ्याची समस्या गंभीर असून त्यावर उतारा म्हणून केंद्राने ‘सिंगल युज प्लॅस्टिक’च्या वस्तूंच्या वापरावर पुढील वर्षीच्या १ जुलैपासून बंदी लागू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पुढील वर्षाअखेरपर्यंत ‘सिंगल युज प्लॅस्टिकमुक्त’ देश बनविण्याचा संकल्प मोदी सरकारने सोडला आहे. त्यानुसार या प्रस्तावित प्लॅस्टिक बंदीची नियमावली जारी करण्यात आली आहे. सध्या देशात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पॉलिथिन पिशव्यांवर बंदी आहे. नव्या नियमांनुसार, पुढील वर्षी ३१ डिसेंबरपासून ७५ ते १२० मायक्रॉन जाडीच्या पॉलिथिन पिशव्यांवर बंदी लागू होईल. १ जुलै २०२२ पासून सिंगल युज प्लॅस्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठा करणे, वितरण, विक्री व वापर यावर पूर्ण बंदीचा निर्णय अंमलात येईल.

plastic bab
Taliban: बंदुकीच्या टोकावरच्या सत्तेला मान्यता नाही; UN, EU चा निर्णय

दोन टप्प्यांत अंमलबजावणी

छोट्या व्यापाऱ्यांना आणि व्यावसायिकांना अडचण येऊ नये म्हणून दोन टप्प्यांत सिंगल युज प्लॅस्टिकबंदी लागू करण्यात येईल, असे पर्यावरण मंत्रालयाच्या नियमावलीत नमूद केले आहे. प्रस्तावित निर्णयाच्या अंमलबजावणीची जबाबदारी संबंधित ग्राम पंचायतींवर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर असेल. कॅरी बॅगसाठी जाडीबाबतचे निर्बंध लागू नसतील. मात्र, कॅरीबॅगच्या उत्पादक- निर्मात्यांना उत्पादन, वितरण, विक्री करण्याआधी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रमाणपत्र घेणे अनिवार्य राहील.

plastic bab
दाभोलकरांच्या हत्येमागील सूत्रधार कधी पकडणार? अंनिसचा शासनाला सवाल

प्लॅस्टिकच्या या वस्तू होणार बंद

- झेंडे, आईस्क्रीम-चॉकलेट कॅंडी आणि फुग्यांबरोबर वापरल्या जाणाऱ्या काड्या

- सजावटीचे थर्माकोल

- प्लॅस्टिकच्या डिश, कप, ग्लास, चमचे, चाकू, निमंत्रण पत्रिका.

- सिगारेट पाकिटांभोवतीचा कागद.

- १०० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे पीव्हीसी बॅनर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.