V. K. Saxena : तुरुंगातून सरकार चालू शकत नाही; नायब राज्यपालांची केजरीवालांवर टीका

केजरीवाल हे तुरुंगातूनच सरकार चालवतील, असे आम आदमी पक्षाकडून सांगण्यात आले होते.
V. K. Saxena
V. K. Saxenaesakal
Updated on

नवी दिल्ली : ‘दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तुरुंगातून सरकार चालवू शकत नाहीत,’ असे विधान नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी आज एका खासगी दूरचित्रवाहिनीशी बोलताना केले. मद्यधोरण गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’ने केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक केली होती. त्यानंतर केजरीवाल हे तुरुंगातूनच सरकार चालवतील, असे आम आदमी पक्षाकडून सांगण्यात आले होते.

V. K. Saxena
Parenting Tips : ‘हम दो हमारा एक’; एकुलत्या एका बाळाला लाडावू नका तर जबाबदार बनवा, या टिप्स येतील कामी

केजरीवाल यांनी ‘ईडी’च्या कोठडीतून आतापर्यंत दोन आदेश दिल्याचे ‘आप’ नेते सांगत आहेत मात्र कोठडीत असताना त्यांनी आदेश कसे काय दिले? असा सवाल उपस्थित करीत भाजपने याबाबतच्या आदेशांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. केजरीवाल यांनी दिलेल्या आदेशाची ‘ईडी’ने देखील दखल घेतली आहे. कोठडीतून आदेश देणे न्यायालयाच्या आदेशाला अनुरूप आहे की नाही, याचा अभ्यास ‘ईडी’ करीत आहे. न्यायालयाने केजरीवाल यांना त्यांची पत्नी सुनीता, सचिव विभव कुमार आणि वकिलांना भेटण्याची परवानगी दिली आहे.

V. K. Saxena
Tax Saving Tips: जुनी करप्रणाली निवडली आहे? कर वाचवायचा असल्यास कोणत्या योजनांमध्ये गुंतवणूक कराल?

रिंकू यांचा भाजपत प्रवेश

आम आदमी पक्षाचे पंजाबमधील जालंधरचे खासदार सुशीलकुमार रिंकू तसेच आमदार शीतल अंग्रुल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, पंजाब भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड तसेच केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यावेळी उपस्थित होते. रिंकू यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे ‘आप’ ने अलीकडेच रिंकू यांना जालंधरमधून उमेदवारी देण्याची घोषणा केली होती. ‘‘ जालंधरच्या लोकांना आपण अनेक आश्वासने दिली होती ती पूर्ण करता आली नाहीत. याला कारण म्हणजे ''आप'' ने माझे समर्थन केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यशैलीमुळे प्रभावित होऊन आपण भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.’’ असे रिंकू म्हणाले.

V. K. Saxena
Child Safety Tips: उन्हाळ्यात कूलर ठरतो फायद्याचा, मात्र लहान मुलांना त्यापासून कसं ठेवाल सुरक्षित? जाणून घ्या

‘मुख्यमंत्री बदल हा ‘आप’चा प्रश्न’

दिल्लीचे मुख्यमंत्री बदलायचे की नाही? हा ‘आप’चा अंतर्गत प्रश्न असल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार संदीप दीक्षित यांनी मांडले आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे माजी खासदार दीक्षित हे दिवंगत मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र आहेत. याआधी त्यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीवर अनेकवेळा टीका केली आहे. परंतु आता मात्र त्यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही.

V. K. Saxena
Summer Travel Tips: जंगल सफारीचा आनंद होईल द्विगुणित, बॅगेत 'या' गोष्टी नक्की ठेवा सोबत

अमेरिकी अधिकाऱ्यांची कानउघाडणी

केजरीवाल यांच्या अटकेवर भाष्य करणे अमेरिकेला चांगलेच भोवले असून याच मुद्यावरून परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्या राजनैतिक अधिकाऱ्याला बोलावून घेत कानउघाडणी केली. भारतातील अमेरिकेच्या दूतावासातील उपप्रमुख ग्लोरिया बेर्बेना यांना आज साउथ ब्लॉकमधील कार्यालयात बोलावून घेण्यात आले होते. भारतीय अधिकाऱ्यांनी तब्बल तीस मिनिटे त्यांची कानउघाडणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.याआधी याच मुद्यावरून जर्मनीच्या राजनैतिक अधिकाऱ्यालाही सुनावण्यात आले होते.

V. K. Saxena
Kitchen Tips : रस्त्यावरील माठात होतं तसं थंडगार पाणी घरच्या माठात का होत नाही?

वकील आक्रमक

दिल्लीतील विविध न्यायालयांमध्ये आम आदमी पक्षाच्या समर्थक वकिलांनी निदर्शने करण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली. न्यायालय परिसरात निदर्शने करण्यात आली तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा दम खंडपीठाने ''आप'' समर्थक वकिलांना भरला. राजकीय उद्देशाने न्यायालयांना युद्धाचे मैदान बनविता येऊ शकत नाही असे एका वकिलाने तक्रारीत म्हटले होते.

V. K. Saxena
Cleaning Tips: संत्र्यांच्या सालींमुळे घरगुती कामे होतील सोपी

‘आज ‘ते’ गौप्यस्फोट करतील’

‘‘मद्यधोरण गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’ने अनेक ठिकाणांवर छापे घातले पण त्यांच्या हाती मात्र काहीच लागले नाही. माझे पती हे उद्या (ता.२८) या बाबत गौप्यस्फोट करतील, असे केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांनी सांगितले. याबाबत सर्व पुरावे न्यायालयात मांडू असे त्या म्हणाल्या.

मागील दोन वर्षांपासून ‘ईडी’ या प्रकरणाचा तपास करत आहे पण अद्याप एक रुपयाही त्यांना सापडलेला नाही. मागे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या घराची झडती घेतली तेव्हा त्यांना केवळ ७३ हजार रुपये सापडले होते.

- सुनीता केजरीवाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.