मोदी सरकारचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांच्या उत्पन्नात होणार कपात?, कच्च्या सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलावरील...

भारत सरकारने कच्च्या सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेलावर मोठा निर्णय घेतला आहे.
oil import
oil importSakal
Updated on

Crude Oil Imports: भारत सरकारने कच्च्या सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क जूनपर्यंत हटवण्याचा निर्णय घेतला आहे. आयात शुल्क सवलतीबाबत सरकारने स्पष्ट केले आहे की 31 मार्चपूर्वी पाठवलेले सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलाची आयात करमुक्त ठेवली जाईल कारण आयात नियमांबाबत संभ्रम निर्माण झाल्याने लाखो कार्गो बंदरांवर अडकले होते.

या वर्षाच्या सुरुवातीला वनस्पती तेलाच्या जगातील सर्वात मोठ्या आयातदाराने 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चालू आर्थिक वर्षासाठी 2 दशलक्ष टन कच्च्या सूर्यफूल तेल आणि सोयाबीन तेलावरील आयात शुल्क सवलत समाप्त केली.

डीलर्सनी सांगितले की या निर्णयामुळे 31 मार्चपूर्वी लोड करण्यात आलेला सुमारे 90,000 टन माल भारतीय बंदरांवर अडकला होता.

वनस्पती तेल ब्रोकरेज आणि कन्सल्टन्सी फर्म सनविन ग्रुपचे सीईओ संदीप बाजोरिया म्हणाले की, काही कार्गो गेल्या काही आठवड्यांपासून बंदरांवर अडकल्या होत्या.

आता सरकारच्या नव्या आदेशानंतर ते देशात येऊ शकतात. भारत प्रामुख्याने अर्जेंटिना, ब्राझील आणि युनायटेड स्टेट्समधून सोयाबीन तेल आणि रशिया आणि युक्रेनमधून सूर्यफूल तेल आयात करतो.

oil import
Delhi Govt vs LG : दिल्लीवर राज्य केजरीवालांचंच! केंद्र सरकारला दणका; नायब राज्यपालांच्या विरोधात सुप्रीम कोर्टाचा निकाल

सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक बीव्ही मेहता म्हणतात की सरकारी अधिसूचनेमुळे आयातदारांना दिलासा मिळेल. त्याचबरोबर आयातीमुळे स्थानिक तेलबियांच्या किंमती कमी होतील.

यासोबतच शेतकऱ्यांचे उत्पन्नही घटणार आहे. ते पुढे म्हणाले की, सोया आणि सूर्यफूल तेलाची उपलब्धता वाढल्याने भारताच्या पाम तेलाच्या आयातीतही मे महिन्यात घट होऊ शकते.

गेल्या आठवड्यात पाच डीलर्सनी नोंदवले की एप्रिलमध्ये पाम तेलाची आयात एका महिन्यापूर्वीच्या तुलनेत 3 टक्क्यांनी घसरून 14 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे.

oil import
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.