कोविशिल्डचा दुसरा डोस आता 12 ते 16 आठवड्यांनी

केंद्र सरकारने कोविशिल्ड लशीमधील कालावधी वाढवण्यास मंजुरी दिली आहे.
Corona Vaccination
Corona Vaccinationfile photo
Updated on
Summary

केंद्र सरकारने कोविशिल्ड लशीमधील कालावधी वाढवण्यास मंजुरी दिली आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कोविशिल्ड लशीमधील कालावधी वाढवण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता पहिला आणि दुसऱ्या डोसमधील कालावधी 12 ते 16 आठवडे ठेवता येणार आहे. सध्या हा गॅप 6 ते 8 आठवडे असा होता. कोरोना लसीचा तुटवडा देशभरात निर्माण झाला. यासाठी राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समिती (NTAGI) गठीत करण्यात आली होती. या समितीने काही शिफारसी केल्या होत्या. त्यातील एक म्हणजे कोविशिल्डच्या (Covishield) दोन डोसमधील कालावधी हा 12 ते 16 आठवड्यांपर्यंत वाढविला गेला पाहिजे. केद्राने ही शिफारस मान्य केली आहे. (Centre gives nod to increasing gap between Covishield shots to 12-16 weeks)

कोवॅक्सिन लसीच्या दोन डोसमधील कालावधीबाबत काहीही बदल करण्यात आलेला नाही. पॅनलने असंही सांगितलंय की, गरोदर महिलांना लस निवडता येईल आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना लस घेता येईल. समितीने कोवॅक्सिनच्या डोसबाबत कोणताही बदल सुचविलेला नाही.

Corona Vaccination
UPSC पूर्व परीक्षा पुढे ढकलली

दुसरा डोस उशिरा दिल्याने कमी होऊ शकतो मृत्यूदर

नव्या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, कोरोना लसीचा दुसरा डोस उशिरा दिल्यास कोरोना संसर्गामुळे होणारे मृत्यू कमी होतील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ६५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या नागरिकांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. परिस्थिती अनुकूल असल्यास या सर्व गोष्टी काम करू शकतात. कारण ही पण एक शक्यता आहे.

Corona Vaccination
रिषभ पंत टीम इंडियाचा कॅप्टन होईल : सुनील गावसकर

काँग्रेसचा आक्षेप

काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश (Jayaram Ramesh) यांनी लसीकरण मोहिमेत पारदर्शकता (transparency in vaccination) हवी अशी मागणी केली आहे. जयराम रमेश म्हणाले, "सुरुवातीला दुसऱ्या डोससाठी ४ आठवड्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर ६ ते ८ आठवड्यांचा कालावधी निश्चित केला गेला. त्यानंतर आता आपण १२ ते १६ आठवडे हा दुसऱ्या डोससाठीचा नवा कालावधी आणू पाहत आहात. सध्या लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने आपण हा निर्णय घेतला आहे? की तज्ज्ञ वैज्ञानिकांनी हा कालावधी वाढवण्याचा सल्ला दिला आहे? आम्ही मोदी सरकारकडून पारदर्शकतेची आशा करावी का?"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.