नवी दिल्ली : भारतात कोरोना काळात कोणत्याही व्यक्तीचा भुकबळी गेलेला नसून, आजही 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिले जात आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसेभेत दिली. यावेळी त्यांनी गेल्या सात वर्षांत देशात 60 हजार स्टार्टअप सुरू असून, सरकारच्या धोरणांमुळे तरुणांची ताकद वाढली आहे असे मोदी म्हणाले. काँग्रेसने मेक इन इंडियाची खिल्ली उडवल्याचे सांगत, मेक इन इंडिया म्हणजे कमिशनचे मार्ग बंद, मेक इन इंडिया म्हणजे भ्रष्टाचाराचे मार्ग बंद, मेक इन इंडिया म्हणजे तिजारी भरण्याचे मार्ग बंद अशी व्याख्या मोदी यांनी यावेळी सभागृहात बोलून दाखविली. (PM Modi About Government policies for Youngsters)
काही लोक देशातील तरुणांना घाबरवण्यात आणि धमकवण्यात गुंतले आहेत. पण देशातील तरुण अशा लोकांचे ऐकत नसून यामुळेच ते प्रगती करत आहेत. आज निर्माण होत असलेल्या स्टार्टअपमध्ये भविष्यात बहुराष्ट्रीय कंपनी बनण्याची ताकद असल्याचेही मोदी म्हणाले. देशातील उद्योजकांना कोरोनाचा व्हेरिएंट म्हटले गेल्याचे सांगत, जे इतिहासातून धडा घेत नाहीत ते इतिहास जमा होता असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
कोरोनाच्या काळात भारताने ज्या प्रकारे प्रगती केली आहे ते अनुकरणीय असून, भारत आज सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत देशात कोरोना पसरवण्याचं खापरही फोडले. भारतात एफडीआयची विक्रमी गुंतवणूक होत असल्याचे सांगत हे सर्व शक्य झाले कारण कोरोनाचे संकट असतानाही आम्ही सुधारणा केल्याचे पंतप्रधान म्हणाले. जगात मोठे संकट आले पण भारताने शेतकऱ्यांना अडचणीत येऊ दिले नाही. कोरोनाच्या काळात खतांचा पुरवठा सातत्याने सुरू ठेवण्यात आल्याचे यावेळी मोदींनी लोकसभेत सांगितले.
यावेळी विरोधकांची खिल्ली उडवत पंतप्रधान म्हणाले की, आम्ही नागरिकांचे आयुष्य बदल्याचा प्रयत्न करत आहोत आणि तुम्ही फाईलमध्येच हरवाला आहात. सरकारने गेल्या सात वर्षांत अनेक क्षेत्रात बदल केले आहेत. प्रत्येक क्षेत्रात उत्पादन वाढत आहे. अर्थव्यवस्था चांगली असेल तरच रोजगार निर्माण होतील. आज सर्वत्र रस्ते, महामार्ग, विमानतळ असून, मुद्रा योजना यशस्वी झाल्याचे पंतप्रधान म्हणाले. लाखो लोक हमीशिवाय कर्ज घेऊन व्यवसाय सुरू करत असून, याचा फायदा करोडो कामगारांना होत आहे. गरीब कामगारांसाठी 2 लाख कोटींहून अधिक खर्च केल्याचेही यावेळी मोदी यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.