Government Scheme For Farmer : रब्बी हंगामात प्रत्येक शेतकऱ्याने घ्यावा 'या' सरकारी योजनांचा लाभ

भारत हा एक कृषिप्रधान देश असून, सुमारे ६० टक्के नागरिक शेतीवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे यावर अवलंबून आहे.
Farmer
FarmerSakal
Updated on

Government Scheme For Farmer : सध्या रब्बी हंगाम सुरू झाला असून, अनेक ठिकाणी पेरणीची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. आज आम्ही तुम्हाला या हंगामात प्रत्येक शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या काही खास योजनांबद्दल माहिती सांगणार आहोत. ज्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होण्यास नक्कीच मदत होईल.

Farmer
RIP : तुम्हीपण श्रद्धांजली देताना ही चूक करता का? वाचा नेमका गोंधळ कुठे होतो

सरकारच्या योजना कोणत्या?

राष्ट्रीय कृषी विकास योजना (National Agricultural Development Scheme)

शेतकऱ्यांना कृषी आणि संबंधित क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना भरड तृणधान्ये, मातीचे आरोग्य आणि पशुसंवर्धनासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. शेतकरी या योजनेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी http://rkvy.nic.in/ या वेबसाईटला भेट देऊ शकता.

कृषी उडान योजना (Krishi Udan Yojana)

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेतमालाच्या वाहतुकीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. यामुळे शेतकऱ्यांची पिके आणि इतर उत्पादने वेळेत बाजारपेठेत पोहोचवली जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी https://agriculture.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करून लाभ घेऊ शकतात.

Farmer
PM Kusum Scheme : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकार देतंय सौरपंपासाठी ९० टक्के अनुदान; असा घ्या फायदा

पंतप्रधान पीक विमा योजना (PM Crop Insurance Scheme)

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान दूर करण्यासाठी सरकारकडून ही योजना राबवली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना एकूण विम्याच्या रकमेच्या रब्बी पिकासाठी 1.5 टक्के आणि खरीप पिकासाठी 2 टक्के प्रीमियम रक्कम भरावी लागते. पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना संपूर्ण विम्याची रक्कम मिळते, या योजनेबाबत अधिक माहितीसाठी शेतकरी https://www.icar.org.in/en/node/2475 या संकेत स्थळाला भेट देऊ शकतात.

किसान क्रेडिट कार्ड योजना (Kisan Credit Card Scheme)

शेतीसाठी शेतकर्‍यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध व्हावे या उद्देशाने ही योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार पैसे दिले जातात. त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याला कर्ज काढायचे असल्यास त्याने अधिक माहितीसाठी शेतकरी अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in ला भेट द्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.