Government Schemes For Girl Child : तुमच्या लाडक्या परीचे भविष्य उज्वल करणाऱ्या सरकारी योजना

देशातील मुलींना पुढे नेण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे विविध योजना राबविल्या जातात.
Government Schemes For Girl Child
Government Schemes For Girl ChildSakal
Updated on

Government Schemes For Girl Child : देशातील मुलींना पुढे नेण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे विविध योजना राबविल्या जातात. त्यात मुली या प्रत्येक घरातील प्रत्येकाच्या लाडक्या असतात. खास करून मुली वडिलांच्या अगदी जवळ असतात. त्यामुळेच त्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रत्येक आई-वडील विशेष गुंतवणूक करत असतात.

हेही वाचा - आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

Government Schemes For Girl Child
Government Scheme : आंतरजातीय विवाह करणार तर लखपती होणार! काय आहे सरकारची स्कीम

आज आम्ही तुम्हाला केंद्र आणि राज्य सरकारच्या मुलींसाठीच्या योजनांबाबत माहिती सांगणार आहोत. यातील गुंतवणुकीमुळे मुलींच्या शिक्षणापासून लग्नापर्यंत टेन्शस कमी होण्यास नक्कीच मदत होईल. या योजनांतर्गत सरकारकडून आर्थिक मदतही दिली जाते.

Government Schemes For Girl Child
Well Grant : शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना; विहीर खोदा आणि ४ लाख मिळवा

सुकन्या समृद्धी योजना

ही योजना अल्पबचत योजनेंतर्गत ठेवण्यात आली आहे. सुकन्या समृद्धी योजनेत, मुलीच्या जन्मापासून ते 10 वर्षांपर्यंत पालकांच्यावतीने गुंतवणूक केली जाते. सरकार सध्या या योजनेवर 7.6 टक्के परतावा देत आहे आणि या योजनेत वार्षिक किमान 250 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये गुंतवता येतात. या योजनेत जन्मापासून १८ वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते आणि मुलीच्या लग्नापर्यंत मोठी रक्कम जमा करता येते.

बालिका समृद्धी योजना

ही योजनादेखील सुकन्या समृद्धी योजनेसारखीच आहे, या योजनेत मुलीच्या जन्मानंतर 500 रुपये अनुदान दिले जाते. या योजनेअंतर्गत पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खाते उघडता येते. यामध्ये सरकारकडून गुंतवणुकीवर वार्षिक व्याज दिले जाते, या योजनेत केलेली गुंतवणवूक मुलगी १८ वर्षांची झाल्यावरच काढता येते.

Government Schemes For Girl Child
सरकारी योजना चांगली, पण वेशीला टांगली! काय झाले मेळघाटातील टेलिमेडिसीन सेवेचे?

CBSE उडान स्कीम

उडान योजना मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत सुरू करण्यात आली आहे. ही योजना मुलींसाठी ऑफलाइन आणि ऑनलाइन शिक्षणाची सुविधा प्रदान करते. यासह या योजनेत मुलींना अभ्यासाचे साहित्यासह प्रीलोडेड टॅब्लेटदेखील दिले जातात.

मुख्यमंत्री लाडली योजना

झारखंड राज्याने मुख्यमंत्री लाडली योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत मुलीच्या नावावर पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यात पाच वर्षांसाठी 6000 रुपये जमा केले जातात.

Government Schemes For Girl Child
Video: सर्व सरकारी योजना 'आधार'शी जोडणार

माझी कन्या भाग्यश्री योजना

महाराष्ट्र शासनामार्फत चालविण्यात येणाऱ्या या योजनेंतर्गत लाभार्थी मुलगी आणि तिच्या आईच्या नावाने राष्ट्रीय बँकेत संयुक्त खाते उघडले जाते. तसेच दोघींनाही 1 लाख रुपयांचा अपघात विमा आणि 5,000 रुपयांचा ओव्हरड्राफ्ट दिला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.