सरकारी शाळेत शिक्षकांनी दोन दलित मुलींना गणवेश उतरवण्यास भाग पाडल्याची घटना समोर आलीय.
उत्तर प्रदेशातील हापूरमध्ये (Uttar Pradesh Hapur) एका सरकारी शाळेत (Government school) शिक्षकांनी दोन दलित मुलींना (Dalit Girls) गणवेश उतरवण्यास भाग पाडल्याची घटना समोर आलीय. ही घटना 11 जुलै रोजी घडलीय. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर या शिक्षकांना (Teacher) विभागानं निलंबित केलं होतं. मात्र, आता पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केलाय.
ही घटना धौलाना ब्लॉकच्या दहीरपूर गावात असलेल्या कंपोजिट प्रायमरी स्कूलची (Composite Primary School) आहे. या शाळेत शिकणाऱ्या दोन दलित विद्यार्थिनींनी शिक्षकांवर शाळेचा गणवेश काढून इतर मुलींना घातल्याचा आरोप केलाय. दोन्ही विद्यार्थिनींच्या पालकांच्या म्हणण्यानुसार, शिक्षक शाळेच्या ड्रेसमध्ये विद्यार्थिनींचे फोटो काढत होते. मात्र, शिक्षकांनी त्यांच्या मुलींचे फोटो काढले नाहीत, उलट त्यांच्या मुलींना गणवेश काढून देण्यास सांगितलं आणि त्यांचा गणवेश इतर दोन मुलींना दिला, असा आरोप त्यांनी केलाय.
जातीभेदामुळं शिक्षकांनी मुलींशी भेदभाव केल्याचा आरोप पालकांनी केलाय. मुलीच्या आईचं म्हणणं आहे की, 'शिक्षक शाळेच्या ड्रेसमध्ये विद्यार्थिनींचे फोटो काढत होते. पण, माझ्या मुलीचा फोटो काढला नाही, त्याऐवजी माझ्या मुलीला तिचा गणवेश काढून दुसऱ्या मुलीला देण्यास सांगण्यात आलं. मुलीनं तसं करण्यास नकार दिल्यानं त्यांनी तिला मारहाण करून तिचा गणवेश जबरदस्तीनं काढला.'
ही बाब समोर आल्यानंतर, जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी अर्चना गुप्ता यांनी 13 जुलै रोजी दोन्ही शिक्षकांना निलंबित केलं होतं. बीएसएनंही या प्रकरणाचा तपास गटशिक्षणाधिकार्यांकडं सोपवला होता. मात्र, आता याप्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी दोन्ही शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. हापूरचे सहाय्यक पोलीस (Police) अधीक्षक म्हणाले, दोन्ही शिक्षकांविरुद्ध कलम 323, 504 , 166 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याच बरोबर कलम 505, 355 आणि कलम 3 (2) (v) आणि SC/ST कायद्यान्वये पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
शिक्षकांचं म्हणणं आहे की, 'त्यांनी कोणत्याही मुलींशी भेदभाव केला नाही. सर्व मुलांना 11 जुलै रोजी शाळेचा गणवेश घालून शाळेत येण्याची सूचना देण्यात आली होती. त्या दिवशी विद्यार्थ्यांचं शाळेच्या ड्रेसवरती फोटो काढले जाणार होते. मात्र, या दिवशी काही विद्यार्थी गणवेशात आले नाहीत, त्यामुळं गणवेशात येणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेशात नसलेल्या मुलांना फोटोसाठी त्यांचा ड्रेस देण्यास सांगण्यात आलं.'
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.