सरकार साखर निर्यातीवर घालणार बंदी? निर्यात मर्यादित ठेवण्याचीही शक्यता

Government to ban sugar exports after wheat
Government to ban sugar exports after wheatGovernment to ban sugar exports after wheat
Updated on

केंद्र सरकार गव्हाप्रमाणे साखरेच्या (sugar) निर्यातीवर (export) बंदी घालण्याचा विचार करीत असल्याचा दावा रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या वृत्तात करण्यात आला आहे. अहवालानुसार, देशाअंतर्गत किमतीत होणारी वाढ रोखण्यासाठी सरकार जवळपास सहा वर्षांत प्रथमच साखरेच्या निर्यातीवर निर्बंध घालू शकते. सरकार या हंगामात निर्यात १० दशलक्ष टनांपर्यंत मर्यादित ठेवण्याचीही शक्यता आहे. (Government to ban sugar exports after wheat)

भारत हा जगातील सर्वांत मोठा साखर (sugar) उत्पादक देश आहे. ब्राझील हा दुसरा सर्वांत मोठा निर्यातदार (export) आहे. सप्टेंबरमध्ये संपलेल्या चालू विपणन वर्षात भारताने १८ मे पर्यंत ७.५ दशलक्ष टन साखर निर्यात केली आहे. भारतातून आयात करणारे प्रमुख देश इंडोनेशिया, अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती, मलेशिया आणि आफ्रिकन देश आहेत.

Government to ban sugar exports after wheat
इतिहासकार इरफान हबीब म्हणतात; ...तर लाल किल्ला-ताजमहाल तोडून बघा

विपणन वर्ष २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० मध्ये अनुक्रमे ६.२ लाख टन, ३८ लाख टन आणि ५९.६० लाख टन साखर निर्यात झाली. देशातील एकूण साखर (sugar) उत्पादनात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकचा वाटा ८० टक्के आहे. देशातील इतर प्रमुख ऊस उत्पादक राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, बिहार, हरयाणा आणि पंजाब यांचा समावेश होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.