Ayodhya Ram Mandir : ''आम्हाला फक्त तीन मंदिरं मुक्त करायची आहेत, ती प्रेमाने द्या..'' गोविंदगिरी महाराज स्पष्टच बोलले

छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदींशी केल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आणि ज्यांनी अयोध्येत मोदींचा उपवास सोडला ते गोविंदगिरी महाराज यांनी एक विधान केलं आहे. पुण्यात असताना त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना इतर मंदिरांबाबत भाष्य केलं.
Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram Mandiresakal
Updated on

पुणेः छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदींशी केल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आणि ज्यांनी अयोध्येत मोदींचा उपवास सोडला ते गोविंदगिरी महाराज यांनी एक विधान केलं आहे. पुण्यात असताना त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना इतर मंदिरांबाबत भाष्य केलं.

अयोध्येत राम मंदिर उभारल्यानंतर पुढे काय? असा प्रश्न उपस्थित होत होता. शिवाय ज्ञानवापीच्या तळघरात पूजा झाली. त्यामुळे हिंदू पक्षाकडून एक-एक मंदिर मुक्त करण्याची मोहीम सुरु झालीय का, असा प्रश्न उपस्थित होत होता. त्याला गोविंददेव गिरी महाराजांनी उत्तर दिलं आहे.

ते म्हणाले की, आम्हाला फक्त तीन मंदिरं मुक्त करायची आहेत. (अयोध्या, ज्ञानवापी, कृष्णजन्मभूमी) आम्हाला भविष्यात जगायचं आहे, भूतकाळात नाही. देशाचं भविष्य चांगलं पाहिजे. त्यामुळे समजदारीने हे तीन मंदिरं दिली तर आम्ही बाकीचं सगळं विसरुन जावू.

देशात इतरही काही मंदिरं पाडून तिथे मशिदी बांधल्या गेल्यात त्याचं काय? या प्रश्नाला उत्तर देताना गोविंददेव गिरी महाराज म्हणाले, त्यांनाही आम्ही समजावून सांगू. कारण सगळ्या ठिकाणांसाठी एकच गोष्ट बोलता येणार नाही. कुठे समजदार लोक असतात तर कुठे नसतात. जिथे जशी परिस्थिती असेल तिथे तशी भूमिका घेऊ.. आम्हाला अशांतता निर्माण करायची नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

स्वामी गोविंददेव गिरी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आळंदीत महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान, गीता परिवार, श्रीकृष्ण सेवा निधी, संत श्री ज्ञानेश्वर गुरुकुल यांच्यावतीने गीता भक्ती अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पत्रकार परिषदेत स्वामी गोविंददेव गिरी यांनी या कार्यक्रमाबाबत तसेच संत विचार, राममंदिर, ज्ञानवापी मशिदीबाबत भूमिका स्पष्ट केली.

Ayodhya Ram Mandir
Grammy Awards 2024: भारतीय संगीताचा मोठा गौरव, 'ग्रॅमी'वर उमटवली मोहोर! 'This Moment' ने मारली बाजी

''ज्ञानवापी म्हणजे हिंदू-मुस्लिम वाद नाही''

‘अयोध्येतील राम मंदिरानंतरचे पुढचे पाऊल सर्वांसाठी भक्तीचे असले पाहिजे. न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीबाबत निकाल दिला. हा हिंदू-मुस्लिम विवाद असल्याचे कुणीही समजू नये. भारतात आक्रमकांनी जो अपमान केला त्या अपमानाची चिन्हे पुसली गेली पाहिजेत, हाच उद्देश मंदिर निर्माणाबाबत आहे,’ अशी भूमिका अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.