Corbevax ला बूस्टर डोससाठी परवानगी; कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन घेतलेल्यांनाही घेता येणार लस

सुरुवातीला घेतलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीपेक्षा वेगळ्या कंपनीची लस बूस्टर डोस म्हणून घेण्यात देशात पहिल्यांदाच परवानगी देण्यात आली आहे.
corbevax_Corona Vaccine
corbevax_Corona Vaccine
Updated on

नवी दिल्ली : कोर्बोव्हॅक्स (Corbevax) कोरोना प्रतिबंधक लसीला आता बूस्टर डोससाठी केंद्राकडून परवागनी देण्यात आली आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीला घेतलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीपेक्षा वेगळ्या कंपनीची लस बूस्टर डोस म्हणून घेण्यात देशात पहिल्यांदाच परवानगी देण्यात आली आहे. (Govt nod to Corbevax as precaution dose with Covaxin or Covishield)

जर तुम्ही कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन या लशींचे दोन डोस घेतले असतील तर तुम्हाला याच लशींचे बूस्टर डोस आत्तापर्यंत घ्यावे लागत होते. पण आता यामध्ये नवा पर्याय केंद्र सकारने आणला असून या दोन्हींपैकी कोणतीही लस घेतलेली असली तरी आता बूस्टर डोस म्हणून कोर्बोव्हॅक्सची लस घेता येणार आहे.

corbevax_Corona Vaccine
Rupee Bank : पुण्यातील रुपी सहकारी बँकेचा रिझर्व्ह बँकेकडून परवाना रद्द!

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले, "कोर्बोव्हॅक्स आता बूस्टर डोस म्हणून उपलब्ध असेल. कोव्हॅक्सिन किंवा कोविशिल्डचा दुसरा डोस घेऊन ६ महिने झाल्यानंतर किंवा दुसऱ्या डोसनंतर २६ आठवड्यांनी कोर्बोव्हॅक्सचा बूस्टर डोस घेता येणार आहे. १८ वर्षे वयावरील व्यक्तींनाच हा बूस्टर डोस घेता येईल"

corbevax_Corona Vaccine
देशांतर्गत विमान प्रवास महागणार?; सरकारच्या 'या' निर्णयाचा होणार परिणाम

दरम्यान, सरकारच्या परवानगी नंतर आता कोविन पोर्टलवर याबाबत आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत. येत्या १२ ऑगस्टपासून अर्थात येत्या शुक्रवारपासून कोर्बोव्हॅक्सला बूस्टर डोस म्हणून देण्यास सुरुवात होईल, असंही आरोग्य सचिवांनी यासंदर्भात काढलेल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.