पेगॅसस सरकारने विकत घेतलं का? हेरगिरी झाली की नाही? पेगॅसस नावाचं हत्यार लोकशाही विरोधात का वापरलं जात आहे? या प्रश्नांचा भडीमार राहुल गांधी यांनी संसदेबाहेर पत्रकार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर केला. विरोधकांनी आज एकत्रपणे संसदेबाहेर पत्रकार परिषद घेत मोदी सरकारच्या कामकाजावर टीका केली. पेगॅससबद्दल संसदेत बोलू दिलं जात नाही. विरोधी पक्षाचा आवाज संसदेत दाबला जातोय, असा आरोपही यावेळी राहुल गांधी यांनी केला.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज आठवा दिवस असून लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ सुरूच आहे. पेगॅसस पाळत प्रकरण, कोरोना मुद्द्यांवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेससह 14 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सरकारला घेरण्यासाठी आणि दबाव टाकण्यासाठी तयारी केली आहे. राहुल गांधींसह इतर नेत्यांनी बुधवारी पेगॅसस मुद्द्यावर लोकसभेच्या कामकाजाच्या स्थगितीची नोटीस दिली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.