Hyderabad Liberation Day : आता देशभरात साजरा होणार 'मराठवाडा मुक्ती दिन'; केंद्र सरकारची मोठी घोषणा!

17th September Celebrated As Hyderabad Liberation Day Latest News : केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी रात्री मोठी घोषणा केली असून आता दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी 'हैदराबाद मुक्ती दिवस' साजरा केला जाणार आहे
Government of India has decided to celebrate 17th September every year as Hyderabad Liberation Day marathi news
Government of India has decided to celebrate 17th September every year as Hyderabad Liberation Day marathi news
Updated on

17th September Celebrated As Hyderabad Liberation Day Latest News : केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी रात्री मोठी घोषणा केली आहे. आता दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी 'हैदराबाद मुक्ती दिवस' साजरा केला जाणार आहे. हैदराबाद स्वतंत्र्य लढ्यातील शहीदांचे बलीदान लक्षात राहवे यासाठी हा दिवस देशभरात साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

१७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतुन मुक्त झाला. हैद्राबाद मुक्ती संग्राम यशस्वी करुन मराठवाड्यातील जनतेने निजामाच्या अन्यायी राजवटीविरुद्धचा लढा यशस्वी केला. तो दिवस १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आता दरवर्षी देशभरात 'हैद्राबाद मुक्ती दिवस' म्हणून साजरा होणार आहे.

Government of India has decided to celebrate 17th September every year as Hyderabad Liberation Day marathi news
Implementation of CAA : राज्य सरकार आपल्या राज्यात CAA लागू होण्यापासून रोखू शकतात का? जाणून घ्या कायदा काय सांगतो

गृह मंत्रालयाने याबद्दल अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये हैदराबात १५ ऑगस्ट रोजी भारत स्वातंत्र झाल्यानंतर देखील १३ महिने निजामांच्या शासनाखाली होता आणि त्याला स्वतंत्र्य मिळाले नव्हते. ऑपरेशन पोलो नावाने पोलीस कारवाई नंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबादच्या निजामाच्या शासनापासून मुक्तता मिळाली. गृह मंत्रालयाने म्हटलं की या परिसरातील लोकांती मागणी होती की १७ सप्टेंबर हैद्राबाद मुक्ती दिवस म्हणून साजार केला जावा.

तसेच अधिसूचनेत पुढे म्हटले आहे की, आथा हैदराबादला स्वतंत्र्य मिळवून देणाऱ्या शहीदांच्या आठवणीत आणि तरुणांच्या मनात देशभक्तीची ज्योत पेटवण्यासाठी मोदी सरकारने दरवर्षी १७ सप्टेंबर हा 'हैदराबाद मुक्ती दिवस' म्हणून साजरा केला जाईल.

भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीखाली होते. यावेळी रझाकारांनी येथील लोकांवर खूप अत्याचार केले. तेव्हा हैदराबादच्या तत्कालिन निजामाने भारतीय संघराज्यात विलीन होण्यास विरोध करत एकतर पाकिस्तानात सहभागी होण्याचा किंवा मुस्लीम देशाची मागणी केली होती. तेव्हा येथील नागरिकांनी हैदराबाद भारतात विलीन करण्यासाठी रझाकारांच्या अत्याचाराविरोधात लढा दिला.

Government of India has decided to celebrate 17th September every year as Hyderabad Liberation Day marathi news
Gautam Adani : अदानींच्या 'त्या' प्रकल्पाला तारळे खोऱ्यातील नागरिकांचा कडाडून विरोध; काय आहे प्रकल्प, का होतोय विरोध?

१७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद राज्य निजामांच्या शासनाखाली होते. त्याला भारतात विलीन करण्याच श्रेय तात्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना जातं. सैन्य कारवाईच्या मदतीने हैदराबाद भारतीय संघ राज्यात विलीन करण्यात आलं. आता हा दिवस हैदराबाद मुक्ती दिवस म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा मोदी सराकरने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.