कोरोनात परदेशातून काय मदत मिळाली? केंद्राचा खुलासा

भारतात कोरोनाचा हाहाकार सुरुच आहे. दररोज 3 लाखांच्या जवळपास कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहे.
CORONA AID
CORONA AID
Updated on
Summary

भारतात कोरोनाचा हाहाकार सुरुच आहे. दररोज 3 लाखांच्या जवळपास कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहे.

नवी दिल्ली- भारतात कोरोनाचा हाहाकार सुरुच आहे. दररोज 3 लाखांच्या जवळपास कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहे. कोरोना परिस्थितीत थोडीशी सुधारणा झाली असली तरी काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला होता. देशातील आरोग्य सुविधा कमी पडत होत्या. रुग्ण हॉस्पिटल बेड, ऑक्सिजनसाठी वणवण फिरत होते. देशातील कोरोनाची गंभीर स्थिती जगभरात चर्चेचा विषय ठरली होती. याच काळात जगातील अनेक देशांनी भारतासाठी मदतीचा हात पुढे केला. अनेक देशांनी ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर, व्हेंटिलेटर भारतात पाठवले. परदेशाकडून भारताला किती मदत मिळाली, याबाबत केंद्राने माहिती जाहीर केली आहे. न्यूज एजेन्सी 'एएनआय'ने यासंदर्भातील वृत्त दिलंय. (Govt of India has been receiving international cooperation of COVID19 relief medical supplies equipment)

कोरोना काळात परदेशातून भारताला विविध प्रकारची मदत मिळत आहे. 27 एप्रिलपासून अनेक देशांनी भारत सरकारला वैद्यकीय मदत केली आहे. परदेशातून मिळाली मदत राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना कोरोना परिस्थितीशी लढ्यात मदत मिळेल, असं केंद्र सरकारने म्हटलंय. कोरोना काळात परदेशातून किती मदत मिळाली याबाबतही केंद्राने खुलाला केला आहे. 27 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 दरम्यान 15,567 ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर, 15,801 ऑक्सिजन सिलिंडर, 19 ऑक्सिजन निर्मिती प्लँट, 10,950 व्हॅंटिलेटर आणि जवळपास 6.6 लाख रेमडेसिव्हिर वायल्स रस्ते किंवा हवाई मार्गाने पुरवण्यात आल्याचं केंद्रानं म्हटलं आहे.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे. बदलत्या वातावरणामुळेही रुग्ण आणि मृतांच्या संख्येत वारंवार चढउतार होत आहेत. गुरुवारी (ता.२०) दिवसभरात २ लाख ५९ हजार ५९१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ४ हजार २०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे ३ लाख ५७ हजार २९५ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.