Inflation In India : गगनाला भिडलेल्या महागाईवर लवकर दिलासा; अर्थमंत्र्यांचे महत्त्वपूर्ण संकेत

गगनाला भिडलेल्या महागाईमुळे सामान्यांचे आर्थिक गणित पुरतं कोलमडलं आहे.
inflation
inflationSakal
Updated on

Nirmala Sitharaman On Inflation : गगनाला भिडलेल्या महागाईमुळे सामान्यांचे आर्थिक गणित पुरतं कोलमडलं आहे. मात्र, वाढलेल्या या महागाईपासून सरकार लवकरच दिलासा देईल, असे आश्वासन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

inflation
Winter Session : विरोधी पक्ष आक्रमक; अधिवेशनात महागाई, घुसखोरीवर चर्चा हवी

जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर सरकार सातत्याने लक्ष ठेवून असून, महागाई कमी करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. वाढलेली महागाई कमी करण्यासाठी सरकार योग्य पावलं उचलत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.लोकसभेत अनुदानाच्या मागणीशी संबंधित विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्र्यांनी महागाई कमी करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांबद्दल माहिती दिली.

सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 8 रुपयांनी आणि डिझेलवर 6 रुपयांनी प्रतिलिटर कपात केली आहे. या निर्णयामुळे किरकोळ महागाई दर RBI च्या टॉलरन्स लेव्हलवर आली आहे. नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाईचा दर 5.88 टक्के होता. डॉलरच्या तुलनेत रुपयाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, जगातील इतर चलनाच्या तुलनेत भारतीय चलन सर्वात मजबूत स्थितीत आहे. भारतीय चलनाने डॉलरच्या तुलनेत जगातील इतर देशांच्या चलनापेक्षा चांगली कामगिरी केली आहे.

सरकारच्या प्रयत्नांमुळे मार्च 2022 पर्यंत बँकांचा NPA 7.28 टक्क्यांवर आला आहे. 2022-23 मध्ये 7.5 लाख कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाच्या उद्दिष्टापैकी 54 टक्के खर्च झाला आहे. चालू आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये दैनंदिन वित्तीय तुटीचे 6.4 टक्के लक्ष्य निश्चितपणे गाठले जाईल, असेही सीतारामन यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.