Toll Free: आता वीस किलोमीटरपर्यंत टेन्शन फ्री गाडी चालवा! एक रुपयासुद्धा द्यायची गरज नाही; पण या आहेत अटी

GNSS: वाहनाने २० किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास केला तर वाहनधारकांकडून पुढच्या वीस किलोमीटरप्रमाणे फीस वसूल केली जाईल. या बदलांचा उद्देश हा जवळच्या प्रवासासाठी चालकांचा बोझा कमी करण्यासाठी आहे. लांबच्या प्रवासासाठी योग्य ते शुल्क आकारले जाणार आहेत.
Toll Free: आता वीस किलोमीटरपर्यंत टेन्शन फ्री गाडी चालवा! एक रुपयासुद्धा द्यायची गरज नाही; पण या आहेत अटी
Updated on

नवी दिल्लीः रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मंगळवारी राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. नवीन नियम, राष्ट्रीय महामार्ग सुधारणा नियम २०२४ या नावाने ओळखला जाईल. या नियमांतर्गत राष्ट्रीय महमार्गांवर सुरुवातीचे २० किलोमीटर शून्य शुल्क धोरण लागू करण्यात आलेलं आहे.

यापूर्वी जुलै महिन्यात रस्ते मंत्रालयाने FASTag सोबतच प्रायोगित तत्त्वावर ग्लोबल नेव्हिगेशन सिस्टम (GNSS) नुसार टोल संकलन प्रणाली लागू करण्याची घोषणा केली होती. नवीन नियमांनुसार २० किलोमीटरपर्यंत मोफत प्रवास करायचा असल्यास GNSS चा अवलंब करावा लागणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग, स्थायी पूल, बायपास रस्ता, बोगद्यातील रस्ता.. या मार्गावरील सुरुवातीचे २० किलोमीटर मोफत प्रवास करता येणार आहे. राष्ट्रीय परमिट असलेल्या वाहनांना या नियमांनुसार लाभ घेता येणार नाही.

Toll Free: आता वीस किलोमीटरपर्यंत टेन्शन फ्री गाडी चालवा! एक रुपयासुद्धा द्यायची गरज नाही; पण या आहेत अटी
BJP Campaign: ''ठाकरे गटाचे घोटाळे काढले.. माझ्यावर तीन वेळा हल्ले झाले, आता ही जबाबदारी नको'' किरीट सोमय्यांची पोस्ट

वाहनाने २० किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास केला तर वाहनधारकांकडून पुढच्या वीस किलोमीटरप्रमाणे फीस वसूल केली जाईल. या बदलांचा उद्देश हा जवळच्या प्रवासासाठी चालकांचा बोझा कमी करण्यासाठी आहे. लांबच्या प्रवासासाठी योग्य ते शुल्क आकारले जाणार आहेत.

मंत्रालयाकडून काढण्यात आलेल्या आदेशामध्ये म्हटलंय की, ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टम आधारित शुल्क प्रणालीनुसार जे चालक, मालक किंवा वाहनाचा प्रभारी व्यक्ती राष्ट्रीय परमिटशिवाय त्याच भागात प्रवास करत असेल तर त्याला संबंधित दिशेला २० किलोमीटरपर्यंतचा प्रवास मोफत असेल. जर प्रवास २० किलोमीटरपेक्षा जास्त झाला तर केवळ योग्य त्या प्रवासाच्या अंतराप्रमाणे पैसे कपात होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.