मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात एका १३ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील राम सागर पासवान नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल, आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
कोरेगांव विधानसभा मतदार संघात शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे वर्चस्व 27 ग्रामपंचायतीवर शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे वर्चस्व.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना स्वतःच्याच मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. भुजबळांच्या येवला मतदारसंघात ठाकरे गटाने बाजी मारली आहे. सात पैकी फक्त एका ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीला मिळवता आला विजय. त्यामुळे भुजबळांना मोठा धक्का बसला आहे.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी एकहाती वर्चस्व मिळवली आहे. विरोधकांना धुळ चारत 13 पैकी 12 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार दत्ता भरणे यांच्या मतदार संघात भाजपला 11 तर राष्ट्रवादीला 8 आणि स्थानिक आघाडीला 7 जागेवर विजय मिळाला आहे. इंदापूर तालुक्यात भाजपची सरशी झाली.
शिंदे गटाचे नेते आणि पालकमंत्री शंभुराज देसाईंना मोठा धक्का बसला आहे.सातारा जिल्ह्यातील किवळ ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसने १२ पैकी १२ जागांवर विजय मिळवत शिंदे गटाला धुळ चारली आहे.
बहुचर्चेत असलेल्या नांदगावमध्ये नितेश राणे यांनी सत्ता राखली आहे. शिवसेनेच्या उपनेते गौरीशंकर खोत यांना मोठा धक्का बसला आहे. नितेश राणे यांनी याच गावाला धमकी दिली होती.
साताऱ्यातील फलटण हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो फलटणमध्ये 24 ग्रामपंचायतींपैकी 20 ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे गेल्या आहेत.
राज्यभरात निवडणूक निकालांनंतर जल्लोष सुरु असतानाच जळगावातून धक्कादायक बातमी समोर आलीये. निवडणूक निकालानंतर दोन गट आमने-सामने आले. दोन्ही गटातील कार्यकर्ते परस्परांत भिडले. यावेळी दोन समूहांकडून तुफान दगडफेक देखील करण्यात आली. या प्रकारात एक भाजपचा (BJP) कार्यकर्ता गंभीर जखमी झाला. दुर्दैवानं यात त्याचा मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील टाकळी इथं ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गटात शाब्दिक वाद झाले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी परस्परांवर दगडफेक सुरु केली. या दगडफेकीत अनेक कार्यकर्ते जखमी झाले. त्यातील भाजपचा धनराज माळी नावाचा २५ वर्षीय कार्यकर्ता गंभीर जखमी झाला. कार्यकर्त्यांनी जखमीला तत्काळ सरकारी रुग्णालयात नेलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जळगावात खळबळ माजलीये. आहे. जळगाव जिल्ह्यातील 123 ग्रामपंचायतींचे निकाल आज समोर येत आहेत.
स्वराज्य संघटनेनं महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये जोरदार मुसंडी मारलीये. धाराशिव येथील सरपंचासह 13 सदस्य निवडून आले आहेत. तर, नाशिकमध्ये सरपंचासह सदस्यपदी कार्यकर्ते निवडून आले आहेत. आतापर्यंतच्या निकालानुसार स्वराज्य संघटनेच्या 3 ग्रामपंचायत विजयी झाल्या आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील गणेशगाव व वासोल गाव तसंच धाराशिव जिल्ह्यातील तडवला ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
पुणे : जिल्ह्यात 221 पैकी आतापर्यंत 74 ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकड सर्वाधिक 46 ग्रामपंचायती आल्या आहेत. तर भाजपकडं 11 ग्रामपंचायत, शिवसेना उद्वव बाळासाहेब ठाकरे गटाकडं 6, तर शिंदे गटाकडं 1 ग्रामपंचायत, काँग्रेसकडं आतापर्यंत 15 ग्रामपंचायती आल्या आहेत.
बीड : राज्यातील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत आहे. थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार पार पडलेल्या निवडणुकींचा निकाल जाहीर होत असून महाविकास आघाडीतील घटक पक्ष बाजी मारतात की सत्ताधारी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकते याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. नवगण राजुरी म्हणजे, एकेकाळी जिल्ह्याच्या राजकारणाचं केंद्र. दिवंगत केशरबाई क्षीरसागर यांच्यानंतर गावच्या व सर्कलच्या राजकारणाची सुत्रं त्यांचे पुत्र रवींद्र क्षीरसागर यांच्याकडं राहिली. पुढं काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व पुतणे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांच्यातील राजकीय ठिणगीनंतर तिसऱ्यांदा राजुरीकरांनी संदीप क्षीरसागर यांच्याच बाजूनं कल दिलाय.
बिडकीन ग्रामपंचायत शिवसेना तालुकाप्रमुख मनोज पेरे यांच्या ताब्यात गेलीये. सरपंचपदी अशोक धर्मे विजयी तर विजय चव्हाण गटाचे पाच सदस्य, भुमरे साहेब गटाचे तीन तर अपक्ष तीन ठिकाणी विजयी झाले आहेत.
केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासाठी प्रतिष्ठेची राजूर गणपती ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात गेलीये.
आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडीमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची एकतर्फी सत्ता आलीये. सरपंच पदाच्या उमेदवार असलेल्या पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर सरपंच पदावर विजयी झाल्या आहे. निवडणूक लागल्यावर पडळकरवाडी गावामध्ये आधी हिराबाई पडळकर यांना बिनविरोध सरपंच करण्याचा ठराव केला होता. मात्र, तालुक्यातील निवडणुका चुरशीच्या बनल्याने पडळकरवाडीमध्ये देखील सरपंच पदासाठी निवडणूक लागली होती.
करवीर तालुक्यातील कावणे गावात भाजपानं बाजी मारलीये.
बामणी निढोरी आणि रणदिवेवाडी या कागल तालुक्यातील तीनही गावात भाजपचा झेंडा फडकला आहे.
राज्यातील 7,751 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक घेण्यात आली. त्यापैकी 590 ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक झाली आहे.
कोल्हापूरमधील 43, सांगलीत 28, रायगडमध्ये 50, बीडमध्ये 34 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 44 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे 7,731 ग्रामपंचायतींचा निकाल पाहणं बाकी आहे.
यापैकी भाजप आणि शिंदे गटाच्या ताब्यात 252 ग्रामपंचायती आहेत.
पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. तर सकाळी आठ वाजेपासून राज्यातील विविध भागात मतमोजणीला सुरुवात झालीये.
मावळ तालुक्यात एकूण ९ ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी ६, भाजप एक उमेदवार निवडून आला आहे. २ जागांचे निकाल अद्याप बाकी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी हा गड राखला आहे.
परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर यश मिळताना दिसून येत आहे. धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात त्यासाठी मोठी विजय उत्सव करण्याची तयारी करण्यात आली असून कार्यकर्त्यांच्या स्वागतासाठी स्टेज करण्यात आले आहे, तसंच डॉल्बी आणि ढोल-ताशाच्या गजरात कार्यकर्ते आपला आनंद उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करत आहेत. मतदारसंघातील बहुतांश ग्रामपंचायत निवडणूकमध्ये धनंजय मुंडे समर्थक उमेदवार विजयी झाले आहेत किंवा आघाडीवर असल्याचे प्राथमिक फेरीत दिसून येत आहे.
कोदोरी
१) लीना गजानन केणे - २६३ विजयी
२) बालिका दिगंबर दांडगे - १४३ पराभव
सावनेर
१) अर्चना विनोद ठाकरे - ६३६ विजयी
२) सरोज प्रमोद तायडे - ६०२ पराभव
लोहगाव
१) सीमा बाबाराव सानप - ७६४ विजयी
२) मंदा विनायक नागरगोजे - ३९५ पराभव
खिरसाणा
१) विशाल मेश्राम - २७१ विजय
२) निवृत्ती जगताप - २२६ पराभव
माऊली चोर
१) संगीता अनिल झंजाट - ५७८ विजय
२) ममता प्रदीप चोरे - ४०८ पराभव
पुणे जिल्ह्यातील भोर ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिल्या तीन ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून तिन्ही ठिकाणी काँग्रेसचा सरपंच झाला आहे. कर्नावाड, अंगसुळे, ब्राम्हणघर ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे सरपंच विजयी झाले आहेत. ब्राह्मणघर ग्रामपंचायत रंजना धुमाळ सरपंच विजयी, अंगसुळे ग्रामपंचायत राणी किरवे सरपंच तर कर्नावाड ग्रामपंचायत सोनाली राजीवडे सरपंच झाल्या आहेत.
जावळी तालुक्यातील कुसुंबी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाच्या दोन्ही उमेदवारांना समसमान मतं पडली असून चिठ्ठीवर निर्णय होणार आहे. साधू चिकणे व मारुती चिकणे यांच्यात शेवटपर्यंत संघर्ष पहायला मिळत आहे.
रत्नागिरी - दापोली तालुक्यात आमदार योगेश कदम यांचा दबदबा पहायला मिळत असून 14 ग्रामपंचायतींवर शिंदे गटांचा विजय झाल्या तर, 2 ग्रामपंचायतींवर ठाकरे गटाचा झेंडा फडकला आहे. वेळवी आणि कळंबट ग्रामपंचायत ठाकरे गटाकडं गेलीये.
भोर तालुका - ग्रामपंचायत निवडणुकीचा चार ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून दोन ठिकाणी काँग्रेस, एक राष्ट्रवादी, एक स्थानिक आघाडीचा सरपंच विजयी झाले आहेत.
पसुरे गाव : प्रवीण धुमाळ, स्थनिक आघाडी विजयी
वाघस गाव : निकिता आवाळे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार विजयी
कारी: सतीश ढेबे, काँग्रेस उमेदवार विजयी
वाठार: सविता खाटपे, काँग्रेस उमेदवार विजयी
एकूण 5 काँग्रेस, 1 राष्ट्रवादी, 1 स्थानिक आघाडी
कवठे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून सरपंचपदी मंदाकीनी पोळ विजयी झाल्या. वाई तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पुन्हा आपला झेंडा फडकाविला. 81 टक्के मतदान झाल्यानं ही निवडणूक अतिशय अटीतटीची, कोणता गट बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. आज सकाळी मतमोजणीत जनतेतून थेट सरपंच पदाच्या तिरंगी निवडीत राष्ट्रवादीच्या भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलच्या मंदाकीनी पोळ यांनी ६०० मतांनी मात केली. ग्रामपंचातीवर पुन्हा राष्ट्रवादीची स्थापन केली.
राष्ट्रवादी काँग्रेस - 1+1+3+1+1=7
भाजप - 1
काँग्रेस - 3
शिवसेना (शिंदे गट) - 0
शिवसेना (ठाकरे गट) - 1
स्थानिक आघाडी - 0
एकूण 221 - 11 (बिनविरोध 45 आहेत)
कुमठे ग्रामपंचायतीत आमदार महेश शिंदे गटाचे संतोष चव्हाण १७१ मतांनी विजयी झालेत. या गटाचे ६ सदस्य विजयी झाले असून आमदार शशिकांत शिंदे गटाचे ९ सदस्य विजयी झाले आहेत. तर निवकणे, सडावाघापूर, गारवडे ग्रामपंचायतीत सत्तांतर राष्ट्रवादीकडून बाळासाहेबांची शिवसेना तर बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या आंब्रग, बहुले व मारूल तर्फ पाटण या तीन ग्रामपंचायतीत सत्तांतर होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व निर्माण झालंय.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटानं खातं उघडलंय. रत्नागिरी तालुक्यातील केळ्ये ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा विजय झाला असून सौरवी पाचकुडे शिंदे गटाच्या सरपंच विजयी झाल्या. हा उद्योग मंत्री उदय सामंत यांचा मतदार संघ आहे.
एकूण ग्रामपंचायत- 222
बिनविरोध - 66
शिवसेना - 37
शिंदे गट - 09
भाजप- 05
राष्ट्रवादी- 02
काँग्रेस- 00
इतर-13
जळगाव : गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील जामनेर तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायत सदस्यपदी विजयी झाल्या. मात्र, त्यांचं ग्राम विकास पॅनल पराभूत झालंय. भाविनी पाटील यांच्या ग्रामविकास पॅनलला 10 पैकी 3 जागा मिळाल्या आहेत. भाविनी पाटील यांचे प्रतिस्पर्धी शरद पाटील यांच्या लोकशाही उन्नती पॅनलला दहा पैकी सात जागा मिळाल्या, त्यात लोकनियुक्त सरपंचपदही शरद पाटलांच्या पॅनलला मिळालं आहे.
कागल तालुक्यातील अतिशय महत्त्वाच्या सेनापती कापशी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मुश्रीफ गटाच्या उज्वला गंगाधर कांबळे या विजयी झाल्या आहेत. तेराहून अधिक जागा मुश्रीफ गटाला मिळालेल्या आहेत. कागल तालुक्यातील बेलेवाडी येथे संजय घाडगे गटाच्या अबोली दशरथ कांबळे सरपंच पदाच्या उमेदवारी विजय झाले आहेत, तर हसूर बुद्रुक येथे या देखील संजय घाडगे गटाच्या शितल लोहार विजयी झाल्या आहेत. हणबरवाडी येथे मंडलिक गटाच्या सोनाली कसलकर या विजयी झालेल्या आहेत. कागल तालुक्यातील बोळावी येथे मुश्रीफ गटाचे सागर ज्ञानदेव माने, तर बाळेगाव येथे मुश्रीफ गटाचे शिरसाप्पा गुंडाप्पा खतकले हे सरपंच पदाचे उमेदवार निवडून आले आहेत.
सिरोंचा - तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत ग्रामपंचायत जाफराबादमध्ये आदिवासी विद्यार्थी संघटना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीचे संपूर्ण पॅनेल सरपंच पदासह 11 सदस्य निवडून आले आहेत.
विधीमंडळातील काँग्रेस पक्ष कार्यालयात महाविकास आघाडीची बैठक सुरु झाली असून माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचा नेते व आमदार उपस्थित आहेत.
बुलडाणा : तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात झालीये. बुलडाणा तहसील कार्यालयात ही मोजणी सुरु आहे. मतमोजणीसाठी ९ टेबलाची व्यवस्था करण्यात आली असून यावर 25 मतदान कर्मचारी मतमोजणी प्रक्रिया सहभागी झाले आहेत.
आळवे- डॉ. वसंत पाटील सरपंचपदी विजयी
मरळी - कमल हंबीरराव चौगले सरपंचपदी विजयी
गोठे - दिपाली विजय पाटील सरपंचपदी विजयी
आकुर्डे - धैर्यशील सतीश पाटील सरपंचपदी विजयी
पणोरे - मालती आवजी पाटील सरपंचपदी विजयी
मोरेवाडी - रणजीत रमेश तांदळे सरपंचपदी विजयी
औरंगाबाद जिल्ह्यात बनगाव ग्रामपंचायत फुलंब्रीमध्ये भाजप विजयी झालं आहे. उषाबाई मुरमे सरपंचपदी विजयी झाल्या तर पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यात पहिला निकाल ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या बाजूनं आला आहे. आव्हाळवाडीतील वार्ड क्रमांक 1 मधून सेनेचे प्रशांत रघुनाथ सातव, सोनाली दाभाडे विजयी झाले आहेत. खंडोबा प्रगती पॅनलचे नितीन घोलपही विजयी झाले आहेत.
राधानगरी तालुक्यात देखील शिंदे गटानं खातं खोललं आहे. हसणे गावामध्ये शिंदे गटाची सत्ता आलीये. तर आजरा तालुक्यातील सरबळवाडीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकलाय. सरपंच उमेदवार सुनीता कांबळे विजयी तर पन्हाळा तालुक्यात तांदुळवाडी ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत ठाकरे गटाच्या सुनीता सरदार पाटील सरपंचपदी विजयी झाल्या आहेत. वेतवडे ग्रामपंचायतीवर स्थानिक आघाडीची सत्ता आलीये. सरपंच पदी रेखा पोवार विजयी झाल्या आहेत.
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात पालकमंत्री शंभूराज देसाईंना मोठी धक्का बसला आहे. सत्ता आली, पण सरपंच राष्ट्रवादीचा झाल्यामुळं राष्ट्रवादीत मोठा जल्लोष करण्यात येत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला निकाल जाहीर झाला असून गुहागर, आबलोली इथं ठाकरे गटानं खातं खोललं आहे. आबलोली इथं ठाकरे गटाच्या सरपंच पदाच्या वैष्णवी नेटके विजयी झाल्या आहेत. हा आमदार भास्कर जाधव यांचा मतदार संघ आहे.
रायगड जिल्ह्यात पाहिले 8 निकाल जाहीर झाले आहेत. महाड तालुक्यात शिवसेना-शिंदे गटाची आघाडी आहे. 8 पैकी 6 ग्राम पंचायतीवर शिवसेना शिंदे गटाचा झेंडा फडकलाय. तर, 2 ग्रामपंचायती महाविकास आघाडीकडं गेल्या आहेत.
सातारा जिल्ह्यात कराड, अंतवडी ग्रामपंचायतीत सत्तांतर झालंय. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला धक्का बसला असून माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचा पॅनेलचा दणदणीत विजय झाला आहे.
कोल्हापूर - राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं खातं खोललं आहे. हेरवाड ग्रामपंचायतीवर स्वाभिमानी आणि काँग्रेस आघाडीची सत्ता आलीये. रेखा अर्जुन जाधव सरपंचपदी विजयी झाल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत जाहीर झालेला निकालांमध्ये राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का बसला आहे.
भाजप – 5
शिंदे गट – 4
ठाकरे गट – 2
राष्ट्रवादी - 1
काँग्रेस - 1
एकूण – 430/ 13
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात स्थानिक आघाडीनं बाजी मारलीये. गोटे गावात दीपाली विजय पाटील सरपंचपदी विजयी तर मोरेवाडी गावात रणजीत तांदळे सरपंचपदी विजयी झाले आहेत. तर दुसरीकडं शिरोळ तालुक्यातील चौथी ग्रामपंचायत शिंदे गटाच्या ताब्यात गेलीये. संभाजीपूरमधूनही सरपंच पदाचे शिंदे गटाचे उमेदवार सचिन कुडे विजयी झाले आहेत.
वरणगे ग्रामपंचायत निवडणुकीत युवराज शिंदे हे सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी.
प्रयाग चिखली ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी रोहित रघुनाथ पाटील विजयी.
जैन्याल : लिलाबाई देवापा गुरव हे सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी.
फराकटेवाडी : शितल रोहित फराकटे हे सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी.
कड्याळ : प्रियांका प्रकाश पाटील हे सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी.
पिराचीवाडी : कल्पना सुभाष भोसले हे सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी.
पिंपळवाडी - महादेव बापु जाधव हे सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी.
हिरवडे खालसा ग्रामपंचायत निवडणुकीत नदीम मुजावर सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी.
नेरली ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत प्रकाश उर्फ अंकुश धनगर विजयी.
कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं खातं खोललं असून व्हनाळी इथं संजय बाबा घाटगे गटाचे दिलीप कडवे सरपंच म्हणून विजयी झाले आहेत.
1) वेल्हे : 28 पैकी 3 बिनविरोध - 25 ठिकाणी मतमोजणी
2) भोर : 54 पैकी 24 बिनविरोध - 30 ठिकाणी मतमोजणी
3) जुन्नर : 17 पैकी 4 बिनविरोध - 13 ठिकाणी मतमोजणी
4) आंबेगाव : 21 पैकी 5 बिनविरोध - 16 ठिकाणी मतमोजणी
5) खेड : 23 पैकी 2 बिनविरोध - 21 ठिकाणी मतमोजणी
6) मावळ : 9 पैकी 1 बिनविरोध - 8 ठिकाणी मतमोजणी
7) शिरूर : 4 पैकी 0 बिनविरोध - 4 ठिकाणी मतमोजणी
8) मुळशी : 11 पैकी 6 ठिकाणी बिनविरोध - 5 ठिकाणी मतमोजणी
9) हवेली : 7 पैकी 0 बिनविरोध - 7 ठिकाणी मतमोजणी
10) दौंड : 8 पैकी 0 बिनविरोध - 8 ठिकाणी मतमोजणी
11) बारामती : 13 पैकी 0 बिनविरोध - 13 ठिकाणी मतमोजणी
12) इंदापूर : 26 पैकी 0 बिनविरोध - 26 ठिकाणी मतमोजणी
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील कावणे गावात भाजपनं बाजी मारलीये. तर, कागल तालुक्यातील कसबा सांगावमध्ये हसन मुश्रीफ गटाला पुन्हा धक्का बसला असून सरपंचपदी राजे- मंडलिक गटाची बाजी मारलीये.
ग्रामपंचायत निकालांत माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर गटाचं वर्चस्व राहिलं असून अकिवाटमधून सरपंच पदाच्या वंदना सुहास पाटील उमेदवार विजयी झाल्या आहेत. खिद्रापूरमधून सरपंच पदाच्या उमेदवार सारिका कुलदीप कदम विजयी तर टाकवडेमधून सरपंच पदाच्या उमेदवार सविता मनोज चौगुले विजयी झाल्या आहेत.
नागपूरमध्ये पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद साधताना फडणवीसांनी भाजपाचा विजय होईल, असं म्हटलंय. आज ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आहे. मी आजच तुम्हाल सांगतो, लिहून घ्या तुम्ही की महाराष्ट्रात पुन्हा नंबर वन भारतीय जनता पार्टीच राहील. कोणी काहीही नरेटीव्ह केलं तरी आपल्याला रेकॉर्डब्रेक जागा मिळतील. कोणी काहीही काळजी करु नका, असं फडणवीस यांनी म्हटलंय.
करवीर तालुक्यातील कावणे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शुभांगी प्रताप पाटील यांच्यासह भाजपनं अन्य चार जागांवर विजय मिळवला आहे, तर विरोधी काँग्रेसला पाच जागा मिळाल्या आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या सुरवातीच्या निकालांमध्ये भाजप-शिंदे गटानं आघाडी घेतली असून 267 जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत, तर महाविकास आघाडी 231 जागांवर आघाडीवर आहे, तर इतर उमेदवार 126 जागांवर आघाडीवर असल्याचं कळतंय.
Jammu Kashmir Encounter : जम्मू-काश्मीरमधील शोपियान भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शोपियानच्या मुंझ भागात दहशतवादी (Terrorist) आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाल्याची माहितीये. या चकमकीत लष्कर या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचे तीन दहशतवादी ठार झाले असून त्यांची ओळख पटवली जात असल्याचं काश्मीर झोन पोलिसांनी (Kashmir Zone Police) सांगितलं. शोपियानच्या मुंझ भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती, त्यानंतर पोलिसांसह सुरक्षा दलाच्या पथकानं तपास मोहीम सुरू केली. सध्या सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराची नाकाबंदी करून शोध मोहीम तीव्र केलीये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.