Gram panchayat Election result 2022 : भाजपा, शिंदे गटाचे वर्चस्व, उद्धव ठाकरेंसाठी चिंतेची बाब

बंडानंतरच्या दीड महिन्यांतच शिवसेनेच्या बंडखोर अर्थात शिंदे गटाने ४० ठिकाणी विजय मिळविला
Gram panchayat Election result
Gram panchayat Election result
Updated on

मुंबई - राज्यात एकीकडे सत्तासंघर्ष सुरू असताना २३८ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या लढतीत ८२ ठिकाणी विजय मिळवून अव्वल ठरल्याचा दावा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने केला असून त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५३ ग्रामपंचायती आल्याचे सांगण्यात येत आहे. बंडानंतरच्या दीड महिन्यांतच शिवसेनेच्या बंडखोर अर्थात शिंदे गटाने ४० ठिकाणी विजय मिळविला असून या पडापडीच्या काळामध्ये शिवसेनेला २७ आणि काँग्रेसला २२ ग्रामपंचायतींमध्ये यश मिळाले आहे.

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील ग्रामपंचायती जिंकल्याचे दिसून येत आहे. स्थानिक आघाड्यांना ४७ ठिकाणी यश आल्याचा दावा केला जात आहे. राज्यातील १५ जिल्ह्यांत २७१ पैकी ३३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या उर्वरित २३८ ग्रामपंचायतींसाठी गुरुवारी मतदान पार पडले होते, त्याचा निकाल शुक्रवारी (ता.६) जाहीर झाला. राज्यात सत्तांतर होऊन नवी समीकरणे जुळून आल्याने या निवडणुकांच्या निकालाची उत्सुकता होती.

बंडखोर आमदारांना मोठे यश

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या काही मतदारसंघातही ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. बहुतांशी ग्रामपंचायतींत या आमदारांचे वर्चस्व कायम राहिले आहे. या बंडानंतर लोक आमदारांना धडा शिकवतील. या शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर आमदारांनी या निवडणुका गांभीर्याने घेतल्या होत्या. या निकालामुळे शिंदे गटाचा उत्साह वाढला असून आगामी निवडणुकांत ताकदीने उतरण्याची तयारी हा गट करणार असल्याचे स्पष्ट आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी फारशी तयारी नसतानाही शिवसेना (शिंदे गट)-भाजप युतीला चांगले यश मिळाले आहे. या निवडणुकीत कष्ट केल्याने हा निकाल लागला आहे. यापुढच्या काळात अधिक जोमाने सर्व निवडणुकांना सामोरे जाऊ.

- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री.

विजयाचे दावे

भाजप ः ८२

राष्ट्रवादी ः ५३

शिंदे गट ः ४०

शिवसेना ः २७

काँग्रेस ः २२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.