RJD : महाआघाडीचे जागावाटप निश्चित; बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल २६ जागा लढविणार

स्वतः ‘राजद’ २६ जागांवर निवडणूक लढणार असून काँग्रेसच्या वाट्याला नऊ जागा आल्या आहेत
RJD
RJDesakal
Updated on

पाटणा : बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या (राजद) नेतृत्वाखालील महाआघाडीने आज जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. स्वतः ‘राजद’ २६ जागांवर निवडणूक लढणार असून काँग्रेसच्या वाट्याला नऊ जागा आल्या आहेत.

RJD
Health Care News : सतत मूड स्विंग्स होत आहेत? मग, रोज करा 'ही' योगासने

राज्यातील ४० पैकी दोन तृतीयांश एवढ्या जागा लालूंच्या पक्षाच्या वाट्याला आल्या आहेत. या आघाडीत समावेश असलेल्या काँग्रेस आणि डाव्या पक्षाच्या वाट्याला मात्र तुलनेने कमी जागा आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय जनता दल यावेळेस २०१९ च्या तुलनेत नऊ जागा अधिक लढत आहे. काँग्रेसला मागील खेपेएवढाच वाटा मिळाला असून नऊ ठिकाणांवरच काँग्रेसचे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी- लेनिनवादी) यांना तीन, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेस राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार मनोजकुमार झा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अखिलेशप्रसाद सिंह आणि डाव्या आघाडीचे नेते उपस्थित होते. या बैठकीतच उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली.

RJD
World Liver Day 2024 : यकृत निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत 'ही' योगासने, जाणून घ्या करण्याची सोपी पद्धत

पूर्णिया ‘राजद’कडे

गया, औरंगाबाद, जामुई आणि नवादा येथून राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

बेगुसराय आणि खगरिया हे दोन मतदारसंघ भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वाट्याला आहेत. या जागावाटपामध्ये राष्ट्रीय जनता दलाने काँग्रेसच्या ताब्यातील पूर्णिया मतदारसंघ हिसकावून घेतला आहे. पूर्णिया येथून नुकतेच काँग्रेसवासी झालेले पप्पू यादव माघार घ्यायला तयार नाहीत. यादव यांनी काही दिवसांपूर्वी त्यांचा जनअधिकार हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला होता. पूर्णियाची जागा आपल्याला मिळेल असा त्यांचा अंदाज होता पण राष्ट्रीय जनता दलाने आक्रमक भूमिका घेतल्याने त्यांना या मतदारसंघावर पाणी सोडावे लागले.

RJD
Mental Health: मेंटली चेकआउट म्हणजे काय? जाणून घ्या लक्षण अन् उपाय

बेगुसरायमधून कोण लढणार?

मागील खेपेस बेगुसराय येथून कन्हैय्याकुमार यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून निवडणूक लढविली होती. तिथे त्यांचा सामना भाजपच्या गिरीराजसिंह यांच्याशी झाला होता. त्या निवडणुकीत कन्हैय्याकुमार हे पराभूत झाले होते. सध्या कन्हैय्याकुमार हे काँग्रेसमध्ये असून त्यांना पुन्हा येथून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा आहे पण त्याबाबत अंतिम निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जाऊ शकतो.

भाजपलाही जागा जिंकाव्या लागणार

भाजपसाठी देखील बिहार हे राज्य महत्त्वपूर्ण असेल. चारशेपारचे मोदी ड्रीम पूर्ण करायचे असेल तर येथील सर्वाधिक जागा भाजप आणि मित्रपक्षांना जिंकाव्या लागतील. मागील खेपेस ४० पैकी ३९ जागा भाजपने जिंकल्या होत्या. एका जागी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता. बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा नितीशकुमार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्याने राजकीय चित्र बदलले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.