दिल्ली-एनसीआर भागातील वायू प्रदूषणाची वाढती पातळी पाहता केंद्र सरकारच्या समितीने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने आज म्हणजेच सोमवारी सकाळी ८ वाजल्यापासून GRAP-४ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी रात्री ८ वाजता दिल्ली-एनसीआरमधील अनेक भागात AQI ४६२ च्या आसपास नोंदवले गेले. प्रदूषणाची पातळी अत्यंत गंभीर श्रेणीपर्यंत पोहोचली आहे. यापूर्वी गुरुवारी दिल्ली-एनसीआरमध्ये GRAP-३ लागू करण्यात आला होता.