रिटेल व्यवसायाची उत्तम प्रगती

खरेदीवर भर : कपडे, पादत्राणे यांची मागणी वाढली
Retail business
Retail businessSakal
Updated on

नवी दिल्ली - कोरोनाबाबतचे निर्बंध शिथिल झाल्याने आणि धोका कमी झाल्याने जनजीवन कोरोनापूर्व काळाप्रमाणे होत आहे. लोक पर्यटन, खरेदी याचा आनंद लुटत आहेत. त्यामुळे देशातील रिटेल व्यवसायात सातत्याने सुधारणा होत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. कोरोना साथ पूर्व काळातील मे २०१९ च्या तुलनेत या मे महिन्यात रिटेल व्यवसायात २४ टक्के वाढ झाली असल्याचे रिटेल उद्योगाची शिखर संघटना, रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (आरएआय) म्हटले आहे.

‘आरएआय’च्या ताज्या ‘रिटेल व्यवसाय सर्वेक्षणा’त ही बाब स्पष्ट झाली आहे. या सर्वेक्षण अहवालानुसार, पश्चिम भारतातील विक्री ३० टक्क्यांनी वाढली, तर पूर्व भारतात मे २०१९च्या तुलनेत विक्रीत २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दक्षिण भारतात २२ टक्के आणि उत्तर भारतात १६ टक्के वाढ झाली आहे.

‘कोरोना साथीच्या आधीच्या काळातील एप्रिल आणि मे महिन्यातील व्यवसाय पातळीच्या तुलनेत यंदाच्या एप्रिलमध्ये २३ टक्के आणि मेमध्ये २४ टक्के वाढीसह विक्रीत सातत्याने सुधारणा होत आहे, हे चिन्ह उत्साहवर्धक आहे, अशी प्रतिक्रिया संघटनेचा मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजगोपालन यांनी व्यक्त केले आहे.

सध्या सुरू असलेल्या लग्नसराईमुळे आणि कार्यालये पुन्हा सुरू झाल्यामुळे कपडे आणि पादत्राणे यांची मागणी वाढली आहे. या दोन्ही व्यवसायांमध्ये चांगली कामगिरी दिसून येत आहे. महागाईची चिंता आहे, मात्र सध्या ग्राहक कोरोना काळाच्या सावटातून बाहेर पडण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे.

- कुमार राजगोपालन, मुख्य कार्यकारी अधिकारी, रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (आरएआय).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.