Kerala : देवभूमीत देवस्थाने करणार हरितक्रांती; केरळ सरकारचा विशेष प्रकल्प

मंदिरांची वृक्षसंपदा वाढविण्यासाठी केरळ सरकारचा विशेष प्रकल्प
Green revolution temples in Devbhoomi Special Project of Kerala Govt tree wealth
Green revolution temples in Devbhoomi Special Project of Kerala Govt tree wealth sakal
Updated on

तिरुअनंतपुरम : वैश्विक तापमानवाढीच्या संकटाचा सामना करण्याबरोबरच राज्यावरील त्याचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी केरळमधील डाव्या आघाडीच्या सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे.

राज्यातील पाच देवस्थान मंडळांच्या नियंत्रणाखाली असलेल्या तब्बल तीन हजार मंदिरांच्या हरित क्षेत्रामध्ये वाढ करण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या शिवाय पारंपरिक जलस्रोतांचे देखील जतन केले जाणार असून मंदिराच्या आवारातील दुर्लक्षित तळी आणि उपवनांचे देखील संरक्षण करण्यात येईल.

या प्रकल्पाला ‘देवनकानम चारूहरितम’ (देवाचे सुंदर हरित निवासस्थान) असे नाव देण्यात आले असून हा प्रकल्प राज्यातील ३ हजार ८०० पेक्षाही अधिक मंदिरांमध्ये राबविण्यात येईल. राज्यातील पाच देवस्थान मंडळे त्याची देखरेख करतील. राज्याचे देवस्थानमंत्री के. राधाकृष्णन यांच्या हस्ते पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिनी त्रावणकोर देवस्थान मंडळाच्या मुख्यालयाच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करून या प्रकल्पाची सुरूवात करण्यात आली.

Green revolution temples in Devbhoomi Special Project of Kerala Govt tree wealth
Richest Temple: देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांची संपत्ती किती आहे?

मंदिरे होणार पर्यावरण रक्षणाचे प्रतीक

राज्यातील मंदिरांना पर्यावरण रक्षणाचे प्रतीक बनविले जाणार असून त्रावणकोर देवस्थान मंडळाप्रमाणेच, कोची, मालाबार, गुरुवायूर आणि कुडलमनिक्कम देवस्थान मंडळाने हा प्रकल्प राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. देवस्थानांच्या मालकीच्या अन्य मालमत्तांवर देखील हा उपक्रम राबविण्यात येईल. पवित्र उपवनांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने ‘कावूम कुलावूम’ हा प्रकल्प आधीच सुरू करण्यात आला आहे.

Green revolution temples in Devbhoomi Special Project of Kerala Govt tree wealth
Nashik Crime: अट्टल घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार गजाआड; 11 घरफोड्यांची उकल

फळे, फुलांची झाडे

मंदिरांच्या आवारामध्ये विविध प्रकारची फळे आणि फुलांची झाडे लावण्यात येणार असून त्यांचा मंदिरांनाच मोठा लाभ होईल. यामुळे त्यांच्याकडे आर्थिक स्वावलंबन देखील येईल, असा विश्वास अनंतगोपान यांनी व्यक्त केला. त्रावणकोर देवस्थान समितीकडे तिरुअनंतपुरम आणि एर्नाकुलम या दोन जिल्ह्यांतील अनेक मंदिरांचे व्यवस्थापन आहे.

Green revolution temples in Devbhoomi Special Project of Kerala Govt tree wealth
Mumbai News : ७३ वर्षीय आजीचे टीसीनी वाचवले प्राण!

जलाशयांचे होणार पुनरुज्जीवन

अनेक मंदिरांमध्ये पारंपरिक जलशयांच्या माध्यमातूनच पाण्याची गरज पूर्ण होते त्यामुळे या जलाशयांचे पुनरुत्थान करण्यात येईल यासाठी सरकारकडून निधी मिळणार असल्याचे अनंतगोपान म्हणाले. अनेक मंदिरांच्या भोवती मोठ्या प्रमाणावर वृक्षराजी आहे त्यांचे देखील जतन करण्यात येईल तसेच उपवनांचे देखील संवर्धन केले जाणार आहे.

केरळमधील देवस्थान मंडळांच्या अखत्यारीमध्ये येणाऱ्या मंदिरांकडे मोठ्या प्रमाणावर जमीन आहे. मंदिराच्या मालकीच्या जमिनीवर वृक्षारोपण करण्याचा आमचा प्रयत्न असून त्यामुळे राज्यातील हरितक्षेत्र वाढण्यास मदत होईल.

- के. अनंतगोपान, त्रावणकोर देवस्थान मंडळाचे अध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.