मध्य प्रदेशातील कटनी येथील एक जीआरपी पोलिसींचा एक कथित व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका वृद्ध दलित महिला आणि तीच्या अत्पवयीन नातवाला पोलिस अधिकारी अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ समोर आल्यावर संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानवर वरिष्ठ जीआरपी अधिकाऱ्यांनी कटनी जीआरपी पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यास पदावरून हटवले आहे. तसेच या संपूर्ण प्रकाराची चौकशी सुरू करण्यात आली आहे.