गृहलक्ष्मी योजनेचे 2,000 रुपये महिलांच्या खात्यावर कधी जमा होणार? महिला व बालविकास मंत्र्यांनी दिली महत्त्वाची अपडेट

Gruha Lakshmi Yojana : गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या प्रमुख आश्वासनांपैकी एक असलेली ही हमी योजना ३० ऑगस्ट २०२३ रोजी म्हैसूरमध्ये सुरू करण्यात आली.
Gruhalakshmi Yojana Lakshmi Hebbalkar
Gruhalakshmi Yojana Lakshmi Hebbalkaresakal
Updated on
Summary

''दोन महिन्यांपासून पैसे मिळत नाहीत. काही तांत्रिक अडचणींमुळे आम्ही जून आणि जुलै महिन्याची रक्कम जमा करु शकलो नाही. आता महिलांच्या बँक खात्यात रक्कम हस्तांतर करणे सुरु झाले आहे.''

बंगळूर : ‘गृहलक्ष्मी’ योजनेच्या (Gruha Lakshmi Yojana 2024) लाभार्थ्यांना कालपासून (ता. ६) रक्कम मिळण्यास सुरुवात झाली असल्याचे महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर (Lakshmi Hebbalkar) यांनी सांगितले. ‘गृहलक्ष्मी’ योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबप्रमुख महिलांना दोन हजार रुपये देण्याची योजना आहे.

गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या प्रमुख आश्वासनांपैकी एक असलेली ही हमी योजना ३० ऑगस्ट २०२३ रोजी म्हैसूरमध्ये सुरू करण्यात आली. ‘मुडा’ घोटाळ्याच्या संदर्भात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधी पक्ष भाजप-धजदने ‘म्हैसूर चलो’ पदयात्रेच्या विरोधात आयोजित केलेल्या काँग्रेसच्या जनआंदोलनाच्या सभेदरम्यान मंड्या येथील जाहीर सभेत हेब्बाळकर बोलत होत्या.

Gruhalakshmi Yojana Lakshmi Hebbalkar
Textile Industry : बांगलादेशातील स्थितीमुळे भारतातील वस्रोद्योगाला 'बरकत'; वस्रोद्योग कंपन्यांचे शेअर्सही वधारले

हेब्बाळकर म्हणाल्या की, काही महिलांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे तक्रार केली आहे की, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दोन महिन्यांपासून पैसे मिळत नाहीत. काही तांत्रिक अडचणींमुळे आम्ही जून आणि जुलै महिन्याची रक्कम जमा करु शकलो नाही. आता महिलांच्या बँक खात्यात रक्कम हस्तांतर करणे सुरु झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.