केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची बैठक (GST Council Meeting)आज चंदीगडमध्ये सुरू राहणार आहे. एक दिवस आधी मंगळवारी जीएसटी बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पहिल्या दिवशी झालेल्या बैठकीत अनेक गोष्टी जीएसटीच्या कक्षेत आणण्यात आल्या आहेत.
पॅक दही, पनीर, मध, पापड, लस्सी, ताक आता महाग होणार आहे. दुसरीकडे, 1000 रुपयांपेक्षा कमी दर असलेल्या हॉटेल रूमवर 12 टक्के जीएसटी आकारण्याची चर्चा आहे. त्याच वेळी, चेक जारी करण्यासाठी बँकांकडून आकारल्या जाणार्या शुल्कावर 18 टक्के जीएसटी देखील लावला जाईल. सोलर वॉटर हिटरवरील जीएसटी 5 टक्क्यांवरून 12 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची चर्चा आहे.
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली, 28 जून 2022 रोजी जीएसटी काऊंसिलची (GST Council) बैठक सुरु झाली आहे. चंदीगढ (Chandigarh) येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीला सर्व राज्याचे अर्थमंत्री हजर आहेत. 1 जुलै 2022 रोजी जीएसटी लागू करण्यास 5 वर्षे पूर्ण होतील. या पार्श्वभूमीवर दोन दिवस अगोदर जीएसटी परिषदेची ही बैठक होत आहे.
ऐनवेळी श्रीनगर येथे होणारी बैठक रद्द करत, ती चंदिगढ येथे ठेवण्यात आली. या बैठकीत काही वस्तूंच्या कर रचनेत(GST Slab) बदल होऊ शकतो. तसेच ई-कॉमर्स पुरवठादारांच्या नोंदणी नियमांमध्ये बदल होऊ शकतो. ही बैठक 28 आणि 29 जून रोजी होत आहे. दर सहा महिन्यांनी परिषदेची बैठक होते.
पहिल्या दिवसाच्या बैठकीनंतर घेतलेल्या निर्णयानुसार, दही, चीज, मध, मांस आणि मासे यासारख्या कॅन केलेला आणि लेबल किंवा ब्रँडेड वस्तू महाग होणार आहेत. दुसरीकडे हॉटेलमध्ये राहणेही महागणार आहे. निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली चंदीगड येथे जीएसटी परिषदेची 47 वी बैठक होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.