तुम्ही कोणत्याही शैक्षणिक संस्थेत गेस्ट लेक्चर (Gust Lecture) देत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता येणार्या काळात तुम्हाला गेस्ट लेक्चर्स देऊन मिळणाऱ्या कमाईवर देखील 18 टक्के वस्तू आणि सेवा कर (GST) भरावा लागेल. (GST on guest lecture)
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, अॅडव्हान्स रुलिंग अथॉरिटी (AAR)च्या कर्नाटक खंडपीठाने असा निर्णय दिला आहे. अर्जदार साईराम गोपालकृष्ण यांनी AAR शी संपर्क साधत विचारले होते की, गेस्ट लेक्चरमधून मिळणारे उत्पन्न करपात्र सेवेत येते का.
रिपोर्टनुसार, हा आदेश पारित करताना, AAR ने सांगितले की अशा सेवा इतर व्यावसायिक (professional), टेक्निकल आणि व्यावसायिक (technical and business services)सेवांच्या अंतर्गत येतात आणि सेवांच्या सूट मधील श्रेणीअंतर्गत नाहीत. त्यामुळे अशा सेवांवर 18 टक्के दराने जीएसटी भरावा लागेल. AAR च्या या आदेशाचा अर्थ असा आहे की, ज्या सेवा व्यावसायिकांचे उत्पन्न 20 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना गेस्ट लेक्चर्सच्या कमाईवर 18 टक्के GST भरावा लागेल.
नवीन प्रश्न उद्भवणार..
एएमआरजी अँड असोसिएट्सचे वरिष्ठ भागीदार रजत मोहन म्हणाले की, या मुळे लाखो फ्रीलांसर, शैक्षणिक, संशोधक, प्राध्यापक आणि इतरांसाठी अडचणी सुरु होतील उघडेल. हे लोक ठराविक रक्कम घेऊन त्यांचे ज्ञान शेअर करतात.
शिक्षक, प्रशिक्षक आणि मार्गदर्शक (Mentor) म्हणून पार्ट टाईम काम करणार्या व्यक्तींना देखील या निर्णयानंतर GST भरण्याची त्यांची जबाबदारी पुन्हा व्हॅलिडेट करणे आवश्यक आहे असे देखील मोहन पुढे म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.