नवी दिल्ली : देशभरातील तुरुंगात कैदेत असलेल्या ट्रान्सजेंडर कैद्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने सोमवारी नव्या गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. यामध्ये गृहमंत्रालयाने ट्रान्सजेंडर कैद्यांची ओळख पटवून त्यांच्या हक्कांसोबत भेदभाव होणार नाही, यासाठी व्यवस्था करण्यास सांगितले आहे. त्याशिवाय तुरुंग प्रमुख आणि राज्य सरकारांना ट्रान्समेन आणि ट्रान्स वूमनसाठी स्वतंत्र एन्क्लोजर किंवा वॉर्ड तयार करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच कोणताही वॉर्ड बनवला तरी तो पुरुष आणि महिला वॉर्ड जवळ नसावा, असे देखील गाईडलाइन्समध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
गृह मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, ट्रान्सजेंडर कैद्यांसाठी प्रवेश प्रक्रियेदरम्यान, वैद्यकीय तपासणी, कपडे, पोलीस संरक्षणाची मागणी, कारागृहात उपचार आणि काळजी या प्रक्रियेदरम्यान त्यांच्या स्वतःच्या ओळखीचा नेहमीच आदर केला गेला पाहिजे. यासाठी, कारागृह विभाग ट्रान्सजेंडर व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) कायदा, 2019 च्या तरतुदींनुसार ओळख पुरावा मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करू शकतात, असे गाईडलाईन्समध्ये सांगण्यात आले आहे.
ट्रान्सजेंडर्ससाठी स्वतंत्र शौचालय आणि शॉवर सुविधांबाबत गोपनीयता राखली जाण्यासोबतच वॉर्ड बनवताना सामाजिक राहणीमानाचीही काळजी घ्यावी लागेल, असेही नव्याने जारी करण्यात आलेल्या गाईडलाईन्समध्ये सांगण्यात आले आहे. जेणेकरून ट्रान्सजेंडर आणि इतर कैद्यांमधील सामाजिक भेदभावासारख्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पसरू शकणार नाहीत. ट्रान्सजेंडरच्या जेल रजिस्टर सोबतच इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड देखील सामाविष्ट केला पाहिजे. जर न्यायालयाच्या वॉरंटमध्ये कैद्याच्या स्व-ओळखलेल्या लिंगाचा उल्लेख नसेल, तर कारागृह अधीक्षकांना कायदेशीर सेवांच्या मदतीने कागदपत्रात बदल करावे लागतील, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.