Gujarat Election : प्रचारादरम्यान भाजप उमेदवारावर प्राणघातक हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत, कारची तोडफोड

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी कडक सुरक्षा व्यवस्थेत सुरुवात झाली.
Gujarat Assembly Election 2022
Gujarat Assembly Election 2022esakal
Updated on
Summary

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी कडक सुरक्षा व्यवस्थेत सुरुवात झाली.

Gujarat Assembly Election 2022 : गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याआधीच नवसारी जिल्ह्यातील वांसदा विधानसभा मतदारसंघातून (Vansda Assembly Constituency) गुजरात विधानसभा निवडणूक लढवत असलेले भाजपचे उमेदवार पीयूष पटेल यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला.

पियुष पटेल (Piyush Patel) वांसदा येथील झारी गावात होते, तेव्हा त्यांच्या कारची तोडफोड करण्यात आली. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झालीय. भाजपनं काँग्रेस उमेदवार अनंत पटेल यांच्या समर्थकांवर हल्ल्याचा आरोप केलाय. या घटनेची नोंद वांसदा पोलीस ठाण्यात (Vansda Police Station) करण्यात आलीय.

Gujarat Assembly Election 2022
US Same-Sex Marriage Bill : अमेरिकेत समलिंगी विवाह विधेयक मंजूर; जो बायडेन यांनी केलं विधेयकाच्या बाजूनं मतदान

पियुष पटेल यांच्या समर्थकांनी वांसदा पोलीस ठाण्याबाहेर काँग्रेस पक्षाविरोधात घोषणाबाजी केली. बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली. वांसदा हा गुजरातमधील 182 विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा नवसारी जिल्ह्याचा एक भाग असून अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाचा भाग म्हणून गुजरातच्या वांसदा जागेवरही मतदान होत आहे.

Gujarat Assembly Election 2022
G-20 Summit : 'भारताच्या G-20 अध्यक्षपदाला पाठिंबा देण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तयार'

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात 89 जागांवर आज मतदान

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी 8 वाजता कडक सुरक्षा व्यवस्थेत सुरुवात झाली. कच्छ, सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधील 19 जिल्ह्यांतील 89 मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 788 उमेदवार रिंगणात आहेत. 2 कोटींहून अधिक मतदार आज राजकीय पक्षांचे भवितव्य ठरवणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.