गुजरातमधील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत.
अहमदाबाद : गुजरातमधील विधानसभा निवडणुका (Gujarat Assembly Election 2022) जाहीर झाल्या असून निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसलाय. गुजरातमधील भाजप सरकारमध्ये (BJP Government) आरोग्यमंत्री राहिलेले जय नारायण व्यास यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय.
असं मानलं जातंय की, व्यास लवकरच काँग्रेस (Congress) किंवा आम आदमी पक्षात (Aam Aadmi Party) प्रवेश करु शकतात. कारण, यापूर्वी त्यांनी या दोघांशी जवळीक साधलीय. यावेळी आम आदमी पक्षाच्या सक्रियतेमुळं गुजरातमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
माजी आरोग्य मंत्री जय नारायण व्यास (Jai Narayan Vyas) 2007 ते 2012 या काळात गुजरात सरकारमध्ये मंत्री होते. मात्र, त्यांना भाजपनं बराच काळ बाजूला ठेवलं होतं. आता व्यास कोणत्या पक्षात प्रवेश करतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण, काही दिवसांपूर्वी त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची भेट घेतली आहे. एवढंच नाही तर आम आदमी पक्षाच्या काही नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. गेल्या 27 वर्षांपासून राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे.
गुजरातमधील विधानसभेच्या एकूण 182 जागांपैकी 89 जागांसाठी 1 डिसेंबरला आणि उर्वरित 93 जागांसाठी 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील विधानसभा निवडणुकीची अधिसूचना अनुक्रमे 5 नोव्हेंबर आणि 10 नोव्हेंबरला जारी करण्यात येणार आहे. दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं शुक्रवारी 43 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय, यामध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते अर्जुन मोढवाडिया यांचं नाव प्रमुख आहे. पक्षानं जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीनुसार, प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष मोढवाडिया यांना पोरबंदरमधून उमेदवारी देण्यात आलीय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.