Gujarat Assembly Election Result 2022 : गुजरातमध्ये भाजपची ऐतिहासिक कामगिरी; वाचा निकालाचे अपडेट्स

संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागत आहे.
Modi1
Modi1
Updated on

लोकांनी माझी अनेकदा थट्टा केली पण मी यातून शिकलो - मोदी

माझ्या जीवनाचा एक क्षण असा नव्हता ज्याची लोकांनी थट्टा केली. पण मी यातून खूप काही शिकत गेलो. आपल्याला सेवाभाव आणि समर्पणाचा मार्ग निवडायचा आहे. २०४७ मध्ये जेव्हा देश स्वातंत्र्याचा १०० वर्षे साजरा करत असेल तेव्हा आम्ही विकसित भारत लोकांच्या हाती सोपवून जाऊ.

भुपेंद्र पटेल दोन लाखांच्या मतांनी जिंकले याचा आनंद - मोदी

मला याचा आनंद आहे की मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे जवळपास दोन लाखांच्या मतांनी जिंकले आहेत. लोकसभेतही कोणी इतक्या मोठ्या आकड्यानं जिंकत नाही.

या निवडणुकीमुळं तुम्हाला अनेकांना जाणून घेता आलं - मोदी

या निवडणुकीमुळं तुम्हाला अनेकांना जाणून घेता आलं. गेल्या काही निवडणुकीचं अॅनालिसिस केलं तर हे कळेल की जे निष्पक्ष राहतात त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला हवं. उत्तराखंडच्या निवडणुकीत अनेकांचे डिपॉजिट जप्त झालंय.

सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास या भावनेनं आपल्याला पुढे जायचंय - मोदी

येणारा काळ हा देशासाठी आपल्यासाठी खूपच महत्वाचा आहे. सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास या भावनेनं पुढे जात आपल्याला विकसीत भावनेनं पुढे जायचं आहे. आम्हाला जेव्हा जनतेचा आशीर्वाद मिळतो तेव्हा आम्हाला अधिक स्फुरण चढतं.

महिलांचा भाजपवरचा विश्वास हाच आमचा विजय - मोदी

देशातील माता-भगिनी या कमळावरच बटणंच दाबत नाहीत तर त्यांना आशा असते. ते जेव्हा भाजपला मत देतात तेव्हा ते भाजपच्या कार्यकत्यांच्या कपाळी विजयचा टिळा लावतात.

गाव-शहर, गरीब-श्रीमंत सर्वांची पहिली आवड भाजप - PM मोदी

भारत प्रथम या भावनेनं आपल्याला पुढे जायचं आहे. आज देशात गाव किंवा शहर, गरीब किंवा श्रीमंत सर्वांची पहिली आवड भाजप आहे. भाजपला गुजरातच्या आदिवासींचाही मोठा आशीर्वाद मिळाला आहे. गुजरातमध्ये ४० आरक्षित जागांपैकी २४ जागा भाजपनं जिंकल्या आहेत. आज आदिवासी भाजपला आपला आवाज मानत आहेत. भाजपला मोठा प्रतिसाद मिळतोय. हा बदल संपूर्ण देशाला जाणवतोय.

शॉर्टकटचं राजकारणाला भारतीय मतदारांना नकोय -PM मोदी

आमच्या प्रत्येक घोषणेमागे एक दूरगामी विचार असतो. देशाला आज शॉर्टकट नकोय, देशाचा प्रत्येक मतदाराला माहिती आहे की, आपल्यासाठी काय गरजेचं आहे. शॉर्टकटच्या राजकारणाचा किती मोठा परिणाम त्यांना भोगावे लागेल हे त्यांना माहिती आहे.

भारतात गरीबी कमी होत असल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत - PM मोदी

कोणत्या समुदयाकडं किती मत आहेत यावर आम्ही राजकारण आणि देशही चालवत नाही. आम्ही बदलत्या राजकारणाकडं तज्ज्ञही पाहत आहेत. भारतात गरीबी कमी होत आहे. देशात गेल्या आठ वर्षात गरीबांना सुविधा देण्याबरोबर आधुनिक पायाभूत सुविधाही पुरवल्या आहेत.

भाजपसाठी अनेक कार्यकर्त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं

भाजपसाठी अनेक कार्यकर्त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं आहे. व्यक्तीगत पातळीवर सर्व त्यागून त्यांनी समाज आणि देशाच्या सेवेसाठी तत्पर तयार असतात. आम्ही विचार आणि व्यवस्थाही सबळ बनवतो. भाजप आपल्या कार्यकर्त्यांच्या अचाट शक्तीवर विश्वास ठेवूनच आपली रणनीती करते आणि यशस्वी देखील होते. अनेक चढउतार भाजपच्या जीवनात आलेत पण आम्ही आमच्या आदर्शांवर कायम राहिलो आहेत.

गुजरातच्या निकालानं सिद्ध केलंय जनतेचा भाजपवर विश्वास - PM मोदी

गुजरातच्या निकालांनी हे सिद्ध केलंय की सामान्य लोकांच्या गुजरातच्या लोकांसाठी जितक्या आकांक्षा आहेत. तसेच देशासमोर जेव्हा आव्हानं असतात तेव्हा जनतेचा विश्वास भाजपवरच असतो. देश जेव्हा मोठे लक्ष्य निश्चित करतो तेव्हा जनतेचा विश्वास भाजपवर असतो.

गुजरातच्या तरुणांनी आमचं काम पाहून मतदान केलं - PM मोदी

या निवडणुकीत १ कोटींहून अधिक मतदारांनी कधी काँग्रेसचा कार्यकाळ पाहिला नव्हता. त्यांनी केवळ भाजपचं सरकार पाहिलं होतं. आजचा तरुण उगीच कोणालाही मत देत नाही, पहिल्यांदा कामांना पारखून घेतो. त्यामुळं या तरुणांनी भाजपला मोठ्या प्रमाणावर मतदान केलं, त्यांनी सर्व प्रकारचं रेकॉर्ड तोडलं आहे.

गुजरातच्या जनतेनं आत्तापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले - मोदी

गुजरातच्या विजयासाठी नड्डांसह भाजचे कार्यकर्ते आणि गुजरातच्या जनतेचे मी आभार मानतो. मी इथल्या जनतेला आवाहन केलं होतं की, भूपेंद्र-नरेंद्र यांचं रेकॉर्ड मोडलं पाहिजे यासाठी मी खूप मेहनत करेन. पण गुजरातच्या जनतेनं तर राज्याच्या स्थापनेपासून आत्तापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले. गुजरातच्या जनतेनं नवा इतिहास रचला.

भाजपत देशहितासाठी कठोर निर्णयाची हिंमत दाखवते म्हणून लोकांचा पाठिंबा - मोदी

देशभरातील जनता भाजपच्या पाठिशी आहे कारण भाजप देशहिताच्या कठोर निर्णयाची हिंमत दाखवते म्हणून लोकांचा भाजपला पाठिंबा आहे.

हिमाचलमध्ये जनतेनंही भाजपा विजयासाठी प्रयत्न केला - मोदी

हिमाचलमध्ये दरवर्षी सत्ताबदल होतो, त्यानुसार यावेळीही झाला. पण इतिहास असा राहिला आहे की, पाच टक्क्यांहूनही कमी वोट शेअरनं सत्ता बदल होतो. पण यंदा भाजपला एक टक्क्यांहून कमी वोट शेअरनं पराभव झाला. म्हणजेच हिमाचलच्या जनतेनं भाजपच्या विजयासाठी प्रयत्न केला. मी हिमाचलच्या जनतेला आश्वस्त करतो की भाजप भलेही एक टक्क्यांनी कमी राहिली असेल पण विकासाप्रती आमची प्रतिबद्धता शंभर टक्के राहिलं. हिमाचलचे प्रश्न प्राधान्यानं सोडवू, राज्याच्या प्रगतीत आम्ही कधीही कमी येऊ देणार नाही.

गुजरात, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीच्या नागरिकांचे आभार - मोदी

गुजरात, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीतील जनतेचे मी आभार मानतो. त्याचबरोबर निवडणूक आयोगाचेही मी अभिनंदन करतो. या निवडणूक भाग घेणाऱ्या प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याला आणि पक्षाचेही आभार मानतो.

हिमाचलमध्ये भाजपला एक टक्क्यांहून कमी वोट शेअरचा फटका - नड्डा

हिमाचलच्या कार्यकर्त्यांनी मोठी मेहनंत केली. यापूर्वी सरकार बदलायचं तेव्हा पाच टक्के मतदानात फरक पडायचा पण आम्हाला एक टक्क्याहून कमी वोट शेअरचा फटका बसला, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी केजरीवाल यांच्यावर टीका करताना गुजरातचा अपमान करण्यासाठी नवा पक्ष आल्याचं म्हटलं आहे. बेजबाबदार नेत्यानं देशाची मागणी मागावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

पतंप्रधान मोदी भाजप कार्यालयात पोहोचले

गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान मोदी भाजपच्या विजयी उमेदवारांचं अभिनंदन करणार आहे. तसेच त्यांना संबोधित करतील. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात हा कार्यक्रम होत आहे. यासाठी पंतप्रधान कार्यक्रमस्थळी पोहोचले आहेत.

PM मोदी थोड्याच वेळात करणार संबोधित  

गुजरातच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या विजयी उमेदवारांचं आणि कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. दिल्लीतील भाजपच्या हेडक्वार्टरमधून ते थोड्याच वेळात भाषण करणार आहेत. यावेळी गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित असतील. शहा नुकतेच हेडक्वार्टरमध्ये पोहोचले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून भाजपच्या विजयाचं कौतुक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या विजयाचं कौतुक केलं आहे. ट्विट करुन शिंदे म्हणाले, या निवडणुकीत जनतेने भाजपाच्या विजयाला विक्रमाची नवी झालर लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे आणि गुजरातच्या जनतेचे या विक्रमी विजयाबद्दल अभिनंदन केलं.

उद्धव ठाकरेंनी PM मोदींचे केले अभिनंदन

गुजरातमधील विजयानंतर उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं अभिनंदन केलं आहे. गुजरातचा विजय विक्रमी आणि ऐतिहासिक असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

जिग्नेश मेवाणीचा भाजपला धक्का

जग्नेश मेवाणीने भाजपला धक्का. ४ हजार मतांनी भाजपच्या मनीभाई वाघेला यांना पराभूत केलं आहे.

भाजपचं ठरलं! भुपेंद्र पटेलच घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

गुजरातचे विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हेच पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. येत्या १२ डिसेंबर रोजी हा शपथविधी सोहळा होईल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी ही माहिती दिली.

जडेजाच्या पत्नीची फटकेबाजी; 15000 हून अधिक मतांनी विजयी

जामनगर उत्तरमधून भाजपचे उमेदवार आणि भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा जडेजा 15000 हून अधिक मतांनी विजयी झाल्या आहेत. निवडणूक जिंकल्यानंतर रिवाबा जडेजा यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'ज्यांनी मला उमेदवार म्हणून स्वीकारले आणि माझ्यासाठी काम केले, त्यांच्यासोबत मी माझे यश समर्पित करते.' असं रिवाबा जडेजाने म्हटलं आहे.

निवडणुक आयोगाकडून मोठी अपडेट; 22 जागांचा निकाल हाती

निवडणुक आयोगाकडून २२ जागांना निकाल जाहिर करण्याता आला आहे. यापैकी भाजपने २० जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेसने केवळ २ जागांवर विजय मिळवला आहे.

भाजपची आघाडी

गुजरातमध्ये भाजप 159 जागांवर पुढे आहे, तर काँग्रेस 15, आप 5 आणि इतर 3 जागांवर आघाडीवर आहेत.

निवडणुकीच्या पिचवर भारतीय क्रिकेटरच्या पत्नीचा जलवा

गुजरात निवडणुकीत जडेजाच्या पत्नीचा जलवा पाहायला मिळाला. रिवाबा जडेजा 35000 मतांनी आघाडीवर आहे.

साबरमतीमधून हर्षद पटेल विजयी

घटलोडिया मतदार संघातून भूपेंद्र पटेल विक्रमी मतांनी विजयी

निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, 66 हजारांपुढे मतं मिळवत भूपेंद्र पटेल यांची घोडदौड सुरु आहे. पटेल यांनी निश्चित किती मतांनी विजय मिळवला, हे लवकरच स्पष्ट होईल. घटलोडिया मतदार संघ ही गुजरातची व्हीआयपी सीट आहे.

निवडणूक आयोगाने गुजरातमधील पहिला निकाल जाहीर केला

निवडणूक आयोगाने गुजरातमधील पहिला निकाल जाहीर केला असून त्यात भाजपला यश मिळाले आहे. दाहोदमधून भाजपच्या कन्हैयालाल बच्चूभाई किशोरी यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसचे हर्षदभाई वालचंदभाई निनामा यांचा २९३५० मतांनी पराभव केला.

मतदान केंद्रावर काँग्रेस उमेदवाराचा आत्महत्येचा प्रयत्न

गुजरातमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. दरम्यान, मतदान केंद्रावर काँग्रेस उमेदवारा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. गांधीधामचे उमेदवार भरत सोलंकी यांनी EVM मशीनवर आरोप करत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

गुजरातमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

सकाळ पासुन गुजरात निकाल पाहता पुन्हा एकदा भाजपचे कमळ फुलणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे निकाल जाहिर होण्यापूर्वीच, गुजरातमध्ये जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

जडेजाच्या पत्नीच्या गळ्यात आमदारकीची माळ पडणार

उत्तर जामनगरमधून रिवाबा जडेजा आघाडीवर आहेत. रिवाबा जडेजाने तिचे प्रतिस्पर्धी आम आदमी पक्षाचे उमेदवार करसनभाई कर्मूर यांच्यावर १२०२७ मतांची आघाडी घेतली आहे.

गुजरातमध्ये पुन्हा कमळ फुलणार; 151 जागांची आघाडी

गुजरातमध्ये पुन्हा कमळ फुलणार या वाक्याने राजकीय वर्तुळा चर्चेला उधाण आलं आहे.

अहमदाबादच्या सर्व जागांवर भाजप आघाडीवर

अहमदाबादमधील सर्व 15 जागांवर भाजप आघाडीवर आहे. गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे (आप) मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इसुदान गढवी पिछाडीवर आहेत.

घर घर मोदी , हर हर....मोहित कंबोजांचे ट्विट चर्चेत

भाजप 182 पैकी 146 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात भाजप आपला गड राखणार अशी चर्चा सुरु झाली आहे. अशातच भाजप नेते मोहित कंबोज यांनी सूचत ट्विट केले आहे. गुजरात म्हणेल...घर घर मोदी , हर हर महादेव ! असे कंबोज यांनी म्हटले आहे.

भाजप तोडणार रेकॉर्ड

भाजप 182 पैकी 146 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 23 जागांवर मर्यादित असल्याचे दिसत आहे. काही जागांवर आम आदमी पक्षाकडून चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. आम आदमी पक्ष आता 9 जागांवर पुढे आहे. इतर 4 जागांवर आघाडीवर आहेत.

जडेजाची बायको भाजपचा गड राखणार

जामनगर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आणि भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा आघाडीवर आहेत. आपचे उमेदवार आणि पक्षाचा मुख्यमंत्री चेहरा इसुदान गढवी हेही खंभलिया मतदारसंघातून पुढे झाले आहेत.

नवसारी, गानदेवी, जलालपूरमध्ये भाजप तर वांसदामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर सध्या केवळ ३९ जागांसाठीच कल दाखवण्यात आला आहे. यामध्ये भाजप 30, काँग्रेस पाच आणि आम आदमी पार्टी 4 जागांवर आघाडीवर आहे.

गुजरातमध्ये १२८ जागांवर भाजप आघाडीवर

आप केवळ ५ जागांवर आघाडीवर आहे. गुजरातमधील मोरबीमध्ये भाजप 3 जागांवर आघाडीवर आहे. साबरकांठातील हिंमतनगर जागेवर काँग्रेस पुढे, प्रांतिजमध्ये तर इडरमध्ये भाजप पुढे. मेहसाणामध्ये पहिल्या फेरीअखेर कडी जागेवर काँग्रेस, मेहसाणा जागेवर भाजप, उंजा जागेवर भाजप, विसनगर जागेवर भाजप, खेरालूमध्ये काँग्रेस, बेचराजीत काँग्रेस, तर विजापूरमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. मेहसाणाच्या विसनगर मतदारसंघातून आरोग्यमंत्री हृषिकेश पटेल पुढे आहेत.

राजकोटमध्ये भाजप 4 जागांवर आघाडीवर आहे.

गुजरातचं चित्र स्पष्ट, सुरुवातीच्या कलात भाजप आघाडीवर

सुरुवातीच्या कलात भाजप आपला गड राखताना दिसत आहे. तर आप केवळ ३ जांगावर आहे. भाजप १२२ जागांवर पुढे आहे. तर कॉग्रेस २२ जागांवर आघाडीवर आहे.

जिग्नेश मेवाणी आघाडीवर

गुजरातमध्ये भाजप 100 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस 24 जागांवर आघाडीवर आहे. तर आप फक्त तीन जागांवर आघाडीवर आहे.

गुजरातमध्ये भाजपचा श्रीगणेशा

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये आपने खातं उघडलं. गुजरातमध्ये भाजप १८ जागांनी आघाडीवर आहे. तर कॉंग्रेसची ६ जागांवर आघाडी आहे.

पुन्हा भाजप येईल- हार्दिक पटेल

भाजप उमेदवार हार्दिक पटेल पुन्हा भाजपची सत्ता येईल असा दृढ विश्वास व्यक्त केला आहे. निश्चितपणे १३५-१४५ जागांवर भाजप सत्ता स्थापन करेल. भाजप कामाच्या जोरावर पुन्हा निवडुण येईल. गेल्या २० वर्षात येथे एकही दंगल दहशतवादी हल्ला झालेला नाही. लोकांना माहिती आहे की, भाजपने त्यांच्या अपेक्षा पुर्ण केल्या आहेत. त्यांनी भाजपलाच मतदान दिले आहे. कारण त्यांचे भविष्य सुरक्षित आहे.

सकाळी 8 वाजता गुजरात मतमोजणीला सुरुवात

सकाळी 8 वाजता गुजरात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. गुजरातच्या 32 जिल्ह्यातील 182 जागांसाठी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. मतदान केंद्राच्या परिसरात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. काऊंटिंग सेंटरपासून ते स्ट्राँग रुमपर्यंत सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ठिकठिकाणी सुरक्षा दलाचे जवान तैनात ठेवण्यात आले आहेत.

संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागत आहे. 182 जागांसाठी गुजरात विधानसभेची निवडणूक दोन टप्प्यात पार पडली होती. 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबर रोजी गुजरातमध्ये मतदान झालं होतं. आज 37 मतदान केंद्रावर या निवडणुकीची मतमोजणी होत आहे. सध्या गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.